शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP: राष्ट्रवादी, शिंदेसेनेला गृहित धरून आघाडी, युतीची गणिते; आम्ही स्वतंत्र असल्याचा अजित पवार गटाचा पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 12:16 IST

अध्यक्षपदाच्या वाटाघाटी सभापतीपदावर थांबण्याची शक्यता

सांगली : जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनाचे ट्विस्ट अद्याप कायम आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोहोंचे बहुमत अत्यंत काठावर असल्याने पक्षनेत्यांमध्ये वाटाघाटी जोरात सुरु आहेत. शुक्रवारीही बैठका आणि खल सुरु होता.सत्तास्थापनेत महत्वाची भूमिका असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गटाने पाठिंब्यासाठी अध्यक्षपदाची अट घातल्याने आघाडी व युतीपुढे पेच निर्माण झाला आहे. गुरुवारी सायंकाळी अजित पवार गटाने मिरजेत झालेल्या बैठकीत अध्यक्षपदावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्ताव पक्षनेत्या व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देण्यात येणार आहे. या गटाचे ६ सदस्य निवडून आले आहेत. आघाडी व युतीला स्पष्ट बहुमतासाठी अजित पवार गटाच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच पवार गट आक्रमक स्थितीत आहे.दुसरीकडे शिंदेसेनेची भूमिकाही पवार गटाइतकीच महत्वाची ठरली आहे. पक्षाचे ७ सदस्य निवडून आले आहेत. पण पक्षनेते आमदार सुहास बाबर यांनी पाठिंब्याविषयी जाहीर वाच्यता अद्याप केलेली नाही. महायुतीचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र जिल्हा परिषदेत महायुतीचीच सत्ता येईल असे वक्तव्य करताना शिंदेसेनेचे ७ सदस्य जमेत धरले आहेत. त्यामुळे पक्षाच्या पाठिंब्यासाठी भाजपश्रेष्ठींचे प्रयत्न सुरु आहेत.

आम्हाला गृहित धरु नका!राज्यात महायुतीमध्ये अजित पवार गट सहभागी आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेची तयारी करताना भाजपने पवार गटाचे संख्याबळ गृहीत धरले आहे. त्यांचे ६ सदस्य सोबत घेऊन बहुमताचा पल्ला गाठता येईल आणि जिल्हा परिषदेत आपलीच सत्ता येईल, असा भाजपचा हिशेब आहे.दुसरीकडे आघाडीच्या सदस्यांनीही बहुमताची बेरीज करताना पवार गटाला जमेत धरले आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा राज्यपातळीवर सुरू आहे. शिवाय सांगलीत शिराळा तालुक्यातही दोन्ही पक्ष जिल्हा परिषदेसाठी एकत्र लढले आहेत. पवार गटाचा पाठिंबा गृहीत धरताना आघाडीकडून हे दोन दाखले दिले जात आहेत. मात्र पवार गटाने युती आणि आघाडी या दोहोंना धुडकावून लावले आहे. आम्हाला गृहित धरू नका, असा स्पष्ट संदेश दिला आहे.

उपाध्यक्ष, सभापतीपदावर साटेलोटे?अजित पवार गट किंवा शिंदेसेनेशी वाटघाटी करताना उपाध्यक्षपद किंवा सभापतीपदाचा पर्याय पुढे आणला जात आहे. अध्यक्षपदावर अडून न राहता उपाध्यक्षपदासह एक-दोन सभापतीपदे घ्यावीत, असा प्रस्ताव मांडला जात आहे. तो मान्य होण्यावरच सत्तेचे गणित जमणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli ZP: Ajit Pawar group's independent stance complicates alliance calculations.

Web Summary : Sangli ZP faces a power struggle. Ajit Pawar's group demands the president post, challenging alliances. Shinde's Sena's role is crucial. BJP aims for power, but Pawar's group insists on being independent, disrupting calculations for both coalitions.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार