लग्नाचे अमीष दाखवून बलात्कार, संशयीत गजाआड; सांगलीतील घटना

By शीतल पाटील | Updated: November 30, 2023 19:28 IST2023-11-30T19:27:46+5:302023-11-30T19:28:01+5:30

सांगली : तरुणीशी प्रेमाचे नाटक करीत लग्नाचे अमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार दि.१२ ...

By showing the Amish of marriage Rape of young woman, suspect arrested in Sangli | लग्नाचे अमीष दाखवून बलात्कार, संशयीत गजाआड; सांगलीतील घटना

लग्नाचे अमीष दाखवून बलात्कार, संशयीत गजाआड; सांगलीतील घटना

सांगली : तरुणीशी प्रेमाचे नाटक करीत लग्नाचे अमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार दि.१२ ते १६ नोव्हेंबर दरम्यान घडला असून पिडीतेवर बलात्कार केल्यानंतर संशयिताने लग्नास नकार दिला आहे. या प्रकरणातील राहुल श्रीरंग ओलेकर (वय २८, रा. करलहट्टी, ता. कवठेमहांकाळ) याला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरूनी जिल्ह्यातीलच असून ती शिक्षणाच्या निमित्ताने शहरात रहात आहे.  संशयीत राहुल ओलेकर हा तिच्या नात्यातीलच असल्याने त्याची ओळख होती. त्याने पिडीतेशी जवळीक साधत प्रेमाच्या आनाभाका घेतल्या. त्याने लग्नाचे अमीष दाखविले. याचा फायदा घेत संशयीताने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला.

आपली फसवणुक झाल्याचे स्पष्ट होताच पिडीतेने संशयीताविरुध्द शहर पोलिसांत फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी बुधवारी संशयीत राहुल ओलेकर याला गजाआड केले आहे.

Web Title: By showing the Amish of marriage Rape of young woman, suspect arrested in Sangli