शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

स्पर्धा परीक्षेतून ऊस तोडणी मजूर बनला अधिकारी : बोरगावच्या ग्रामस्थांनी दिला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 1:05 AM

ऊसतोड मजूर असणाऱ्या आई, वडिलांचे छत्र हरपले... स्वत:च्या आणि बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी... त्यामुळे त्यानेही ऊस तोडणी मजुरीचा मार्ग स्वीकारला.

ठळक मुद्देसोमनाथची वाटचाल विद्यार्थ्यांना पथदर्शी

इस्लामपूर : ऊसतोड मजूर असणाऱ्या आई, वडिलांचे छत्र हरपले... स्वत:च्या आणि बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी... त्यामुळे त्यानेही ऊस तोडणी मजुरीचा मार्ग स्वीकारला. पोराची जिद्द बघत बोरगावच्या ग्रामस्थांनी त्याला मदतीचा हात दिला. ग्रामस्थांची मदत आणि अपार कष्ट या जोरावर बीड जिल्ह्यातील सोमनाथ नारायण सदगर याने नगरपालिका अभियंता वर्ग २ पदाला गवसणी घातली.

येथील सोमनाथ सदगर याच्या जिद्दी यशाची ही वाटचाल इतर विद्यार्थ्यांना पथदर्शी आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातील हटकरवाडीचा. आई—वडील ऊस तोड मजूर असल्याने ते परजिल्ह्यात जाऊन ऊस तोडणीची कामे करायचे. बोरगाव परिसरात त्यांचा बराच काळ या मजुरीसाठी व्यतित झाला. मुलाला खूप शिकवायचे, अशी या कष्टकºयांची अतीव इच्छा. परंतु नियतीला ते मान्य नव्हते. सोमनाथ दुसरीला असतानाच आई साखराबाई यांचे निधन झाले. वडील नारायण सदगर यांनी काही काळ त्याची जबाबदारी पार पाडली. पण सोमनाथ सातवीत असताना पुन्हा एकदा त्याच्यावर काळाने घाव घातला. सोलापूर जिल्ह्यातील एका कारखान्यासाठी ऊस तोडणीसाठी गेल्यावर वडिलांचा खून झाला. हा त्याच्यावर मोठा आघात होता.

या घटनेमुळे सोमनाथ हा पुरता कोसळून गेला. स्वत:सह बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. त्याने ऊस तोडणीचा मार्ग स्वीकारला. त्याचवेळी बोरगावमधील काही संवेदनशील मनाच्या ग्रामस्थांनी सोमनाथची जबाबदारी स्वीकारली.या ग्रामस्थांच्या मदतीच्या बळावर त्याने स्थापत्य अभियांत्रिकीचे (सिव्हिल) पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यासाठी सेवानिवृत्त शिक्षक डी. आर. सलगर, प्रकाश वाटेगावकर, चंद्रकांत गावडे, सुहास पोळ, मुकुंद वाटेगावकर, शिंदे कुटुंबीय, कारखान्याचे अभियंता जे. बी. पाटील, डी. एम. पाटील यांनी त्याला सर्वतोपरी मदत केली. त्यानंतर अशोक वाटेगावकर यांनी त्याला इस्लामपूरच्या गुरुकुल अ‍ॅकॅडमीत स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दाखल केले. तेथेच त्याने अभ्यास केला.

प्रतिकूल परिस्थितीवर केली मातसोमनाथ सदगरने जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर यशाला गवसणी घातली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याने आपले ध्येय गाठले आहे. सोमनाथने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून नगरपालिका अभियंता वर्ग २ हे पद मिळवत सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. त्याला या खडतर प्रवासात साहाय्य करणाऱ्यांच्या मदतीला त्याच्या यशाने सलाम केला.

टॅग्स :Sangliसांगलीexamपरीक्षा