शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही जातीला उचलून...! 'हा' अधिकार कुठल्याही सरकारला नाही, आम्ही न्यायालयात जाणार"; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
2
k Kavitha: वडिलांनी पक्षातून हाकललं, मुलीने आमदारकीवर लाथ मारली; बीआरएसमधील वाद टोकाला
3
टीआरएफला मलेशिया मार्गे पैसा मिळतोय, लाखो रुपये झाले जमा; एनआयएच्या तपासात उघड
4
सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर
5
“मराठा आरक्षणात CM फडणवीसांचा सिंहाचा वाटा, लक्ष्मण हाकेंनी लुडबूड करू नये”: विखे-पाटील
6
भारताचा 'मोस्ट वॉन्टेड' गँगस्टर बादली अखेर पोलिसांच्या ताब्यात! कंबोडियावरून आणले भारतात
7
Nifty थेट शून्यावर, झिरोदामध्ये तांत्रिक बिघाड; नितीन कामथ झाले ट्रोल
8
ITR फाईल करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतच संधी! अन्यथा भरावा लागेल इतक्या रुपयांपर्यंत दंड
9
"सध्या कमबॅक करणार नाही...", दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीचा निर्णय; लग्नाआधीच झालेली प्रेग्नंट
10
चीनची 'पॉवर परेड'! अण्वस्त्रे, समुद्री ड्रोन आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रे
11
“मनोज जरांगेंना अपेक्षित झालेले नाही, शेवटच्या क्षणी...”; वकील असीम सरोदेंचा मोठा दावा
12
पुतिन-जिनपिंग अन् किम यांचं अमेरिकेविरोधात षडयंत्र; चीनमधील परेड पाहून डोनाल्ड ट्रम्प संतापले
13
फक्त ४०० रुपये रोज वाचवा अन् मुलीच्या भविष्यासाठी ७० लाख मिळवा; पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरेल फायदेशीर
14
"मी टीकाकार असलो तरी, कालचे संपूर्ण श्रेय फडणवीसांनाच...! मराठा आरक्षणाच्या GR नंतर, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
15
ट्रम्प यांना मोठा झटका! जगाला टॅरिफची धमकी देणारा अमेरिका स्वतः मंदीच्या उंबरठ्यावर; मूडीजचा इशारा
16
"एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर...", श्रीकांत शिंदे आरक्षणाच्या निर्णयावर काय बोलले?
17
६० कोटी घोटाळ्याचा आरोप, शिल्पा शेट्टीचा मोठा निर्णय! मुंबईतील 'बॅस्टियन' रेस्टॉरंटला लागणार कुलूप
18
Maharashtra Accident: मुंबईवरून निघाले... कसाऱ्याजवळ मृत्यूने गाठले; कारचा भीषण अपघात, तिघे ठार
19
Virat Kohli Fitness Test : कोहलीसाठी कायपण! BCCI नं परदेशातच घेतली फिटनेस टेस्ट?
20
बांदेकरांच्या घरी बाप्पाची आरती, भावी सूनबाई पूजा बिरारीचीही दिसली झलक; प्रेक्षक म्हणाले...

‘वायफळे’त भारनियमनाने द्राक्षबागा संकटात

By admin | Updated: December 26, 2015 00:14 IST

रब्बीही धोक्यात : शेतकऱ्यांना दिवसभरात चार तासच वीज पुरवठा

प्रवीण पाटील --सावळज -वायफळेसह परिसरात यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे शेतीसाठी पाण्याची चणचण भासत असतानाच गेल्या काही दिवसांपासून महावितरणने २० तास भारनियमन सुरु केल्याने, जे काही थोडेफार पाणी आहे तेही शेतीसाठी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी असूनदेखील फक्त ४ तासात द्राक्षबागा व रब्बीच्या पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.आठवड्यात मंगळवार वगळता तीन दिवस रात्री व तीन दिवस दिवसा ८ तास शेती पंपासाठी वीज देण्यात येत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून शुक्रवार ते रविवार फक्त ४ तासच वीज चालू करण्यात येते. त्यामध्येही अनेकवेळा विजेचा लपंडाव सुरु असतो. त्यामुळे फक्त ४ तासात द्राक्षबागांसह गहू, मका, हरभरा यासह चारा पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. पाणी असून देखील पिके वाळण्याची वेळ आली आहे.द्राक्षबागा सध्या ऐन भरात असल्यामुळे बागांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. या भागामध्ये कोणत्याही शासकीय योजनेचे पाणी येत नसल्यामुळे कूपनलिका व विहिरी याद्वारे शेतीला पाणी पुरवठा केला जातो. मात्र फक्त चार तासात शेतीला पाणी देणे शक्य होत नाही. अगोदरच दुष्काळाने मेटाकुटीस आलेला शेतकरी भारनियमनामुळे हतबल झाला आहे. पूर्वीप्रमाणे ८ तास व सुरळीतपणे महावितरणने वीज पुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिनायावर्षी द्राक्ष बागायतदारांना हवामानाने चांगली साथ दिली आहे. त्यामुळे द्राक्षबागांवर रोगांचा कमी फै लाव आहे. मात्र अगोदरच दुष्काळामुळे पाणीटंचाई व त्यातच वीस-वीस तास भारनियमन, यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. भारनियमन म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना झाला आहे.