रोख रक्कमेत तफावत; सांगली जिल्हा बँक भोसे शाखेतील शाखाधिकारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 18:16 IST2025-06-04T18:15:56+5:302025-06-04T18:16:09+5:30

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून कारवाई 

Branch officer of Sangli District Bank Bhose branch suspended after discrepancy found in cash | रोख रक्कमेत तफावत; सांगली जिल्हा बँक भोसे शाखेतील शाखाधिकारी निलंबित

रोख रक्कमेत तफावत; सांगली जिल्हा बँक भोसे शाखेतील शाखाधिकारी निलंबित

सांगली : भोसे (ता. मिरज) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील शाखाधिकारी व कॅशिअर राहुल विलासराव वास्कर यांना बँकेतील रोख रकमेमध्ये १ लाख २९ हजार रुपये कमी असल्याने निलंबित करण्यात आले. कारवाईनंतर वास्कार यांनी ही रक्कम भरली आहे. मात्र त्यांची खाते अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.

शिवाजीराव वाघ म्हणाले, शासन अनुदान व अन्य खात्यांतील कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हा बँकेतील अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होत आहे. कारवाया सुरू असताना आता आणखी एका शाखाधिकाऱ्यांची भर पडली आहे. बँकेच्या भोसे येथील शाखेत रोजच्या रकमेत १ लाख २९ हजार रुपयांची तफावत आढळली आहे.

ही रक्कम कोठे गेली, याचा ताळमेळ बँकेत नाही. याला कॅशिअर तथा शाखाधिकारी राहुल वास्कर यांना प्रथमदर्शनी जबाबदार धरण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांना वास्कर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. वास्कर यांनी तफावतीची १ लाख २९ हजारांची रक्कम बँकेत भरणा केली आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Branch officer of Sangli District Bank Bhose branch suspended after discrepancy found in cash