येलूरमध्ये गव्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 11:01 IST2022-02-24T11:00:09+5:302022-02-24T11:01:16+5:30

परिसरात भितीचे वातावरण

Both injured in gaur attack in Yelur sangli | येलूरमध्ये गव्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

येलूरमध्ये गव्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

येलूर : येलूर (ता. वाळवा) येथे गुरुवारी सकाळी गव्याच्या हल्ल्यात  दोन शेतकरी जखमी झाले. यातील एक गंभीर जखमी तर दुसऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. गंभीर जखमीवर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

येलूर येथील गावच्या पुर्वेस असलेल्या गोल भाग परिसरात शेतात शेतातील काम करण्यासाठी गेलेल्या सूर्यकांत बाळू जाधव व शिवाजी परसू कुंभार या दोघांवर गव्याने सकाळी आठच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात शिवाजी कुंभार हे गंभीर जखमी झाले. सूर्यकांत जाधव हे किरकोळ जखमी आहेत.

शिवाजी कुंभार यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर सूर्यकांत जाधव यांना येलूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी वनधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. परिसरात भितीचे वातावरण आहे.

Web Title: Both injured in gaur attack in Yelur sangli

टॅग्स :Sangliसांगली