शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

शरीरसौष्ठव स्पर्धेत म्युझिक पोजिंग पुन्हा सुरू करणार; सांगलीत चार जिल्ह्यांच्या बैठकीत निर्णय

By संतोष भिसे | Published: October 15, 2023 6:40 PM

शरीरसौष्ठव स्पर्धेत अस्तंगत झालेल्या म्युझिक पोजींग (संगीताच्या ठेक्यावर पोझ देणे) पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शरीरसौष्ठव संघटनेच्या बैठकीत झाला.

सांगली: शरीरसौष्ठव स्पर्धेत अस्तंगत झालेल्या म्युझिक पोजींग (संगीताच्या ठेक्यावर पोझ देणे) पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शरीरसौष्ठव संघटनेच्या बैठकीत झाला. सांगलीसह सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांतील संघटनांचे पदाधिकारी व शरीरसौष्ठवपटूंची बैठक रविवारी सांगलीत तरुण भारत व्यायाम मंडळात झाली. यावेळी स्पर्धेसाठी विविध नियम व निर्णय घेण्यात आले.

बैठकीला संघटनेचे पदाधिकारी संजय भोकरे, सागर काबरा, अमित डोळे, सुनील सावळवाडे, सागर घोडके आदी उपस्थित होते. फेब्रुवारीमध्ये सांगलीत तीन जिल्ह्यांची शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्याचा निर्णय घोडके यांनी जाहीर केला. स्पर्धेतील वशिलेबाजी, बोगस प्रमाणपत्रे, नोकऱ्यांमधील संधी आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली. कोल्हापूरचे राजेश वडाम यांनी सांगितले की, चमचेगिरी करणाऱ्यांना प्रमाणपत्रे व नोकऱ्या मिळण्याने प्रामाणिक शरीरसौष्ठवपटूंची निराशा होते. शिवछत्रपती पुरस्कार मिळण्यातील वशिलेबाजीनेही नुकसान होते पण यावेळी खेळाडूंनी प्रस्ताव दाखल करावेत, आपण त्यांना पुरस्कारासाठी पाठपुरावा करू. कोल्हापुरात कनिष्ठ गटाची स्पर्धा घेण्याचा निर्णय वडाम यांनी जाहीर केला.

बैठकीला राजेंद्र हेंद्रे (सातारा), स्वामी हिरेमठ (सोलापूर), विवेक संकपाळ, मुरली वत्स, संदीप यादव, दीपक माने, सचिन कुलकर्णी, श्रीकांत माने, सागर घोडके, कैलास शिपेकर, विश्वनाथ बकाली, शेख अन्वर हुसेन, हर्ळ, खरे, शरणकुमार कुंभार हेदेखील उपस्थित होते.

शरीरसौष्ठवपटूंनी चमकोगिरी करू नयेस्पर्धेत पंचांचा निर्णय मान्य नसल्यास अनेक स्पर्धक सोशल मीडियावर विरोधात पोस्ट करतात. त्यामुळे स्पर्धेची, संयोजकांची आणि संघटनेची बदनामी होते. त्याऐवजी स्पर्धकांनी पंच किंवा संयोजकांकडे कायदेशीर दाद मागावी, निर्णयाला आव्हान द्यावे, अशी भूमिका बैठकीचे निमंत्रक इनायत तेरदाळकर यांनी मांडली.

महत्वाचे निर्णय

  • - शरीरसौष्ठव स्पर्धा दुपारी पाच वाजता सुरू करणे
  • - रात्री दहापूर्वी संपवणे, जेणेकरून स्पर्धक रात्रीचा प्रवास सुरक्षितरित्या करून घरी पोहोचतील.
  • - कोणत्याही संघटनेच्या शरीरसौष्ठवपटूला अन्य कोणत्याही संघटनेतर्फे खेळण्याची मुभा
  • - स्पर्धेसाठी उशिरा येणाऱ्या स्पर्धकास दंड, प्रसंगी स्पर्धेत सहभागास मनाई 
टॅग्स :Sangliसांगलीbodybuildingशरीरसौष्ठव