शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावी परीक्षेत कॉपी टाळण्यासाठी बोर्डाने अवलंबला निवडणूक पॅटर्न, नेमका काय.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:58 IST

आजपासून कॉपीविरोधी जनजागृती सप्ताह

सांगली : दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी शाळेच्या बाहेर कितीही बंदोबस्त असला, तरी शाळेतच सामूहिक कॉपी होत असल्याच्या तक्रारी अनेकदा पुढे आल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी परीक्षा मंडळाने आता निवडणुकीचा पॅटर्न अवलंबला आहे. निवडणुका येताच स्थानिक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. त्यांची मतदारसंघाबाहेर उचलबांगडी केली जाते. त्याच धर्तीवर परीक्षेसाठीही आता संबंधित शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांची अन्य शाळेत नियुक्ती केली जाणार आहे.परीक्षेतील गैरमार्गाशी लढा देण्यासाठी सोमवारपासून जनजागृती सप्ताह सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षांना कोल्हापूर विभागीय मंडळातून अडीच लाख विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. परीक्षेत विविध मार्गांनी होणाऱ्या गैरप्रकारांचा मंडळाला सातत्याने सामना करावा लागतो. ते रोखण्यासाठी सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कॉपीमुक्त परीक्षा अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी संबंधित शाळांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची अन्यत्र बदली केली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती बाहेरील शाळेतून केली जाईल. यामुळे सामूहिक कॉपी किंवा अन्य गैरप्रकारांना आळा बसेल असा विश्वास कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कोल्हापूर विभागात बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

आजपासून जनजागृती सप्ताहजनजागृती सप्ताहात कॉपीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीची माहिती देणे, कॉपीमुक्तीची शपथ घेणे, शाळास्तरावर शिक्षासूचीचे वाचन करणे, परीक्षा काळातील आहार व आरोग्याच्या काळजीबाबत उद्बोधन करणे, उत्तरपत्रिका लेखनाविषयी मार्गदर्शन, शाळा परिसरात जनजागृती, ग्रामसभेत कॉपीमुक्तीची माहिती देणे असे उपक्रम राबविले जाणार आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थीTeacherशिक्षक