शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

भाजपचे कमळ फुलण्यापूर्वीच खुडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 3:03 PM

दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजप आॅपरेशन लोटस ही मात्रा लागू करण्याच्या तयारीला लागली आहे. पुन्हा महाराष्ट्रात सत्ता आणू, असाही दावा भाजप करत असताना, वाळवा—शिराळ्यात मात्र जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कमळ फुलण्याअगोदरच खुडण्याची तयारी केली आहे. भाजपमध्ये नुकतेच गेलेले वैभव शिंदे यांना पुन्हा राष्ट्रवादीची आॅफर दिल्याने शिंदे हे चांगलेच चलबिचल झाले आहेत.

ठळक मुद्देभाजपचे कमळ फुलण्यापूर्वीच खुडले वैभव शिंदे यांना पुन्हा राष्ट्रवादीची आॅफर

अशोक पाटील इस्लामपूर : दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजप आॅपरेशन लोटस ही मात्रा लागू करण्याच्या तयारीला लागली आहे. पुन्हा महाराष्ट्रात सत्ता आणू, असाही दावा भाजप करत असताना, वाळवा—शिराळ्यात मात्र जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कमळ फुलण्याअगोदरच खुडण्याची तयारी केली आहे. भाजपमध्ये नुकतेच गेलेले वैभव शिंदे यांना पुन्हा राष्ट्रवादीची आॅफर दिल्याने शिंदे हे चांगलेच चलबिचल झाले आहेत.तत्कालीन युती शासनाच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर—शिराळा मतदार संघात भाजपचे कमळ फुलवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सांगली जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे, वाळवा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती स्वरुप पाटील आणि बहे येथील युवा नेते प्रसाद पाटील यांना भाजपमध्ये घेऊन इस्लामपूर मतदार संघात भाजप सक्षम करण्याचा प्रयत्न झाला. परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वीच जयंत पाटील यांनी हा डाव हाणून पाडत, फुलण्यापूर्वीच कमळ खुडून घेतले.इस्लामपूर पालिकेत नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यारुपाने भाजप सत्तेवर आल्याचा दावा केला जात होता. परंतु अल्पावधीतच त्यांची ताकद संपुष्टात आली. अपक्ष नगरसेवक दादासाहेब पाटील यांना आपल्याकडे घेऊन त्यांना उपनगराध्यक्षपद दिले.

त्यामुळे पालिकेवरील आपली पकड राष्ट्रवादीने अबाधित ठेवली. याचाच फायदा सभापती निवडी आणि विधानसभा निवडणुकीवेळीही झाल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपमधील ज्येष्ठ नेते बाबासाहेब सूर्यवंशी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.विलासराव शिंदे यांच्या निधनानंतर आष्टा येथील राजकीय समीकरणे बदलली. जयंत पाटील गट मजबूत करण्यासाठी मंत्री पाटील यांनी चांगलीच कंबर कसली आहे. विलासराव शिंदे यांच्या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभावेळी थेट, स्वरुप पाटील हे आमचेच आहेत असा चिमटा जयंत पाटील यांनी काढून त्यांची खिल्ली उडवली, तर वैभव शिंदे यांना राष्ट्रवादीची आॅफर देऊन शिंदे गटात खळबळ माजवून दिली आहे. मंत्री पाटील यांच्या आॅफरने वैभव शिंदे हे राष्ट्रवादीच्याच मार्गावर असल्याची चर्चा आष्टा परिसरात रंगू लागली आहे. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSangliसांगली