शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
4
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
5
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
7
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
8
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
9
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
10
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
11
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
12
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
13
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
14
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
15
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
16
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
17
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
19
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
20
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांना खुजे करण्याचा भाजपचा डाव

By admin | Updated: June 17, 2016 23:30 IST

लॉटरीप्रकरणी राष्ट्रवादीचा पलटवार : वाळवा, शिराळा तालुक्यात तर्कवितर्क

अशोक पाटील -- इस्लामपूर --युती शासनाने राज्याची तिजोरी मोकळी केल्याचा आरोप करत सत्तेवर आलेल्या आघाडी शासनाने अर्थखात्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर सोपवली होती. पाटील यांनी राज्याची तिजोरी भरण्यासाठी बाहेरील राज्यांतील लॉटरी आणि आॅनलाईन लॉटरीला परवानगी दिली. त्यातून सनदी अधिकाऱ्याने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. जयंतरावांचे नेतृत्व खुजे करण्यासाठी भाजपचा हा डाव असल्याचे त्यांचे जवळचे कार्यकर्ते बोलत आहेत.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अर्थखात्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर सोपविल्यानंतर त्यांनी ती समर्थपणे पेलली. शासनाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या. त्यामध्ये त्यांनी लॉटरी उद्योगाला पाठबळ दिले. बेकायदेशीर मटक्याच्या रूपाने शासनाचा कोट्यवधी रुपये कर बुडत होता. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून बाहेरील राज्यांतील आॅनलाईन लॉटरीला परवानगी देण्यात आली. यामध्ये जयंत पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप तत्कालीन सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी केला आहे. त्यामुळे राज्यासह सांगली जिल्ह्यात व वाळवा—शिराळा तालुक्यात चर्चा सुरू आहे.सध्या आमदार जयंत पाटील कुटुंबियांसमवेत अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या पश्चात तालुक्यात त्यांच्याविषयी राष्ट्रवादीतील काहीजण दबक्या आवाजात चर्चा करत आहेत, तर काहींना या प्रकरणाविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.केंद्रात व राज्यात भाजप सरकार आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीची सहकार, शैक्षणिक, औद्योगिक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर पकड आहे. त्यामुळे भाजप सरकारने राष्ट्रवादीतील प्रमुख मोहऱ्यांना लक्ष्य करण्याचा डाव आखला आहे.प्रारंभीच्या टप्प्यात अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेले छगन भुजबळ यांना तर त्यांनी तुरुंगात डांबले आहे. आता जयंत पाटील यांच्यावर लॉटरीप्रकरणी संशयाचे ढग निर्माण केल्याची चर्चा आहे.या लॉटरीप्रकरणी पुढे काय होणार याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. खा. राजू शेट्टी हा मुद्दा कितपत उचलून धरतात याकडेही तालुक्याचे लक्ष लागले आहे. राजू शेट्टींची मागणी जयंतरावांच्या विरोधातूनचलोकसभा निवडणुकीत खा. राजू शेट्टी स्वत:च्या विरोधातील उमेदवारापेक्षा जयंत पाटील यांनाच विरोधक मानतात. त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपच्या दारात जाऊन बसली आहे. त्यामुळे खा. राजू शेट्टी यांनी आगामी होणाऱ्या निवडणुका समोर ठेवून, लॉटरी प्रकरणात आ. जयंत पाटील यांच्या चौकशीची मागणी केली आहे.