चंद्रशेखर बावनकुळे-संभाजी भिडे यांची सांगलीत भेट; बंद खोलीआड चर्चा 

By अविनाश कोळी | Updated: November 13, 2022 20:04 IST2022-11-13T20:03:37+5:302022-11-13T20:04:11+5:30

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगलीत संभाजी भिडे यांची भेट घेतली. 

BJP state president Chandrashekhar Bawankule meets Sambhaji Bhide in Sangli | चंद्रशेखर बावनकुळे-संभाजी भिडे यांची सांगलीत भेट; बंद खोलीआड चर्चा 

चंद्रशेखर बावनकुळे-संभाजी भिडे यांची सांगलीत भेट; बंद खोलीआड चर्चा 

सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची रविवारी सायंकाळी सांगलीत भेट घेतली.  त्यांच्यात पंधरा मिनिटे बंद खोलीत चर्चा झाली.

पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, भिडे यांनी राज्याच्या विकासासाठी काही कल्पना दिल्या. त्यावर आम्ही विचार करणार आहोत. भिडे यांना भेटल्यामुळे मला नेहमीच ऊर्जा मिळते. ते आम्हाला आदरस्थानी आहेत. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो होताे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आता ते बरे आहेत. त्यांनी राज्याच्या विकासासाठी काही कल्पना दिल्या. त्यांचा विचार आम्ही जरूर करू.  यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, दीपक शिंदे, विक्रांत पाटील, हणमंत पवार आदी उपस्थित होते.

 

Web Title: BJP state president Chandrashekhar Bawankule meets Sambhaji Bhide in Sangli