शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

भाजपचे संजयकाका पाटील अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटात, संजयकाका विरुद्ध रोहित पाटील ‘कांटे की टक्कर’ होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 12:06 IST

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २९ ऑक्टोबरला अर्ज..

तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीत यावेळी मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपचे नेते माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी घड्याळ हातात घेतले आहे. बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. याचवेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनीही संजय पाटील यांना साथ देण्याची भूमिका जाहीर केली. जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हा निर्णय धक्कादायक आणि अनपेक्षित मानला जात आहे.तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ महायुतीत कोणत्या पक्षाला जाणार? आणि उमेदवार कोण असणार? याबाबत सातत्याने चर्चा होत्या. या चर्चेवर बुधवारी मुंबईत पडदा पडला. हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षातून भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांना विधानसभेच्या आखाड्यात उतरविण्याचा निर्णय झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे यांनी एकत्रित भेट घेतली. यावेळी तिसऱ्या आघाडीचे स्वप्निल पाटील व पांडुरंग पाटील यांच्यासह घोरपडे समर्थक उपस्थित होते. यावेळी संजयकाका पाटील विधानसभा निवडणूक लढवतील, यावर शिक्कामोर्तब झाले.

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २९ ऑक्टोबरला अर्ज..उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संजयकाका पाटील विधानसभा निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार आहेत.

संजयकाकांचे वर्तुळ पूर्ण तासगाव तालुक्यात तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील आणि संजयकाका पाटील यांचे २००८ साली मनोमिलन झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजयकाका सहा वर्षे विधान परिषद सदस्य होते. २०१४ ला त्यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला. तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे संजयकाकांचे एक राजकीय वर्तुळ पूर्ण झाले आहे.

कांटे की टक्कर..दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील या येथील विद्यमान आमदार आहेत. त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केल्याने त्यांचे पुत्र रोहित पाटील यांची उमेदवारी शरद पवार गटाकडून नक्की मानली जात आहे. तसे झाल्यास संजयकाका विरुद्ध रोहित पाटील अशी ‘कांटे की टक्कर’ येथे होईल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४tasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळsanjaykaka patilसंजयकाका पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारRohit Patilरोहित पाटिल