corona virus : भाजप आमदार गोपीचंद पडळकरही कोरोनाबाधीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 17:42 IST2020-09-08T15:29:31+5:302020-09-08T17:42:31+5:30
सांगली जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून, दोन मंत्री व एक आमदार वगळता सर्व आमदार, खासदार कोरोनाग्रस्त झाले आहेत. सोमवारी भाजपचे खासदार संजयकाका पाटील व मंगळवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या चाचण्याही पॉझिटिव्ह आल्या.

corona virus : भाजप आमदार गोपीचंद पडळकरही कोरोनाबाधीत
सांगली : जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून, दोन मंत्री व एक आमदार वगळता सर्व आमदार, खासदार कोरोनाग्रस्त झाले आहेत. सोमवारी भाजपचे खासदार संजयकाका पाटील व मंगळवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या चाचण्याही पॉझिटिव्ह आल्या.
पडळकर यांनी मिरजेतील शासकीय प्रयोगशाळेत चाचणी केली होती. त्यानंतर ते सोमवारी अधिवेशनासाठी मुंबईला रवाना झाले. मंगळवारी सकाळीच त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजले. त्यामुळे ते अधिवेशनाला गेले नाहीत. कोणतीही लक्षणे त्यांना नसल्याने त्यांना होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.
पडळकर कोरोनाबाधीत झाल्याने त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनीही चाचणी घेण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यात आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. अनिल बाबर, आ. विक्रम सावंत, आ. मोहनराव कदम, आ. सदाभाऊ खोत, आ. सुमनताई पाटील, आ. पडळकर हे आठ आमदार कोरोनाबाधीत झाले आहेत.
याशिवाय माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संभाजी पवार, नितीन शिंदे, राजेंद्रअण्णा देशमुख, कॉँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील हेसुद्धा बाधित झाले आहेत. राजकीय क्षेत्राला कोरोनाने कवेत घेतल्याचे चित्र दिसत आहे. अनेक कार्यकर्तेही पॉझिटिव्ह येत आहेत.