विटा-तासगाव मार्गावर दुचाकीची चेन तुटल्याने अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

By शरद जाधव | Updated: October 26, 2023 21:12 IST2023-10-26T21:12:21+5:302023-10-26T21:12:31+5:30

या अपघाताची तासगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Bike chain break ,accident on Vita-Tasgaon road; youth died on the spot | विटा-तासगाव मार्गावर दुचाकीची चेन तुटल्याने अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

विटा-तासगाव मार्गावर दुचाकीची चेन तुटल्याने अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

तासगाव : विटा-तासगाव मार्गावरील महादेव मळा, पानमळेवाडी येथे दुचाकी चालवताना चेन तुटल्यामुळे ताबा सुटून फरफटत जाऊन पाडळी (ता. तासगाव) येथील चैतन्य बाळासो पाटील (२१) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाडळी येथील चैतन्य बाळासो पाटील (२१) हा युवक कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे गलाई व्यावसाय करत होता. आठ दिवसांपूर्वी तो मामांच्या वर्षश्राद्धासाठी गावी आला होता. चैतन्य रात्री उशिरा कामानिमित्त विट्याहून तासगावकडे जात असताना महादेव मळा, पानमाळेवाडी येथे दुचाकीची चेन तुटली.

त्यामुळे वाहनावरील ताबा सुटून अपघात झाला. तीस ते चाळीस मीटर अंतरावर त्याचे डोके घासत गेले. डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. चैतन्यचा अपघाती मृत्यू झाल्याने पाडळी परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघाताची तासगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Bike chain break ,accident on Vita-Tasgaon road; youth died on the spot