शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
3
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
4
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
5
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
6
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
7
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
8
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
9
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
10
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
11
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
12
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
14
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
15
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
16
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
17
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
18
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
19
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘बीडीओं’च्या जीपने केली ४0 लाखांची वसुली

By admin | Updated: March 27, 2015 00:59 IST

आटपाडीत विशेष मोहीम : शासकीय वाहन वसुलीसाठी देऊन देशमुखांची दुचाकीवरून तालुक्यात रपेट

 अविनाश बाड / आटपाडी
मार्च एन्डमुळे बँकांची वसुली पथके कर्जदारांच्या दारात जप्ती आणि वसुलीसाठी धावाधाव करत असताना, आटपाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांची ध्वनिक्षेपक लावलेली जीप घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या वसुलीसाठी नागरिकांच्या दारातून फिरू लागली आहे. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवकांच्या या वसुली मोहिमेला चांगलेच यश मिळू लागले आहे. एका बाजूला जीपविना गटविकास अधिकारी मधुकर देशमुख दुचाकीवरुन फिरत असताना, त्यांच्या शासकीय जीपने मात्र गेल्या चार दिवसांत तब्बल ३८ लाख ९७ हजार रुपये एवढी विक्रमी वसुली केली आहे.
पंचायत समितीच्यावतीने विस्तार अधिकारी पी. ए. शिंदे आणि के. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी खास मोहीम सुरु केली आहे. छोट्या गावातील ५ ते १0 ग्रामसेवकांचे पथक आणि गटविकास अधिकारी मधुकर देशमुख यांची जीप घेऊन काही गावात वाजंत्र्यांसह नागरिकांच्या घरासमोर उभे राहून कर भरण्यासाठी आवाहन करत आहेत.
सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत सर्व ग्रामस्थ हमखास घरी सापडतील अशा कालावधित वसुली केली जात आहे. गोमेवाडी गावात वाजंत्र्यांसह पथकाने घरोघरी जाऊन वसुली केली. कर दिला नाही तर पाण्याचे कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला जात आहे. प्रत्येक कुटुंबियांना त्यासाठी तास-दोन तासांची मुदत दिली जाते. कारवाईच्या भीतीने लोक पैसे भरत आहेत.
याउलट काही गावात या विशेष पथकाला लोकांच्या विविध समस्यांमुळे संतापालाही सामोरे जावे लागत आहे. काहीजण या कारवाईविरुध्द तक्रारी करण्याचा इशाराही देत आहेत. या कारवाईचे संपूर्ण छायाचित्रण करण्यात येत आहे. जीपवर दोन छोटे ध्वनिक्षेपक बसविण्यात आले आहेत. आटपाडी पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच अशी वसुली मोहीम राबविण्यात आली.
मोहिमेत ग्रामसेवक डी. बी. देशमुख, एम. आर. माने, आर. एम. कोळी, सी. डी. कर्णे, एस. एस. ढोले, एस. एन. आदाटे, एस. यू. जाधव, एम. आर. कांबळे, डी. के. मोरे, एस. जी. देशमुख यांचा समावेश आहे.