सराईत गुन्हेगारास भिलवडी पोलिसांनी केले जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 18:20 IST2022-03-21T18:19:39+5:302022-03-21T18:20:06+5:30

भिलवडी : सांगली व सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी दुचाकीसह रोख रक्कम हातोहात गायब करणारा, तसेच बलात्कार व चोरीच्या गुन्ह्यात ...

Bhilwadi police arrested a criminal in jaat sangli | सराईत गुन्हेगारास भिलवडी पोलिसांनी केले जेरबंद

सराईत गुन्हेगारास भिलवडी पोलिसांनी केले जेरबंद

भिलवडी : सांगली व सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी दुचाकीसह रोख रक्कम हातोहात गायब करणारा, तसेच बलात्कार व चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगलेल्या सराईत गुन्हेगारास भिलवडी पोलिसांनी अटक केली. राजेंद्र गणपती केदार (वय ३८ रा. डोणज, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. त्याला गुड्डापूर (ता. जत) येथून ताब्यात घेतले होते.

त्याच्याकडून विविध चोरींमधील रोख रक्कम व पाच दुचाकी असा सव्वालाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याने या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
खंडोबाचीवाडी (ता. पलुस) येथील लहू रामचंद्र शिंदे यांच्या घराचे कुलूप काढून याने ५० हजार रुपयांची चोरी करून पसार झाला होता. या गुन्ह्याची नोंद भिलवडी पोलीस ठाण्यात झाली होती. पोलीस तपासात गुड्डापूर येथे राजेंद्र केदार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी गुरुवारी (दि.१७) मार्च रोजी त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अन्य गुन्ह्यांचीही कबुली दिली. 

Web Title: Bhilwadi police arrested a criminal in jaat sangli