जिल्हा बँकेत 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते-पोलिसांत धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 01:35 PM2022-03-19T13:35:44+5:302022-03-19T13:40:47+5:30

जिल्हा मध्यवर्ती बँकेत राजकीय लोकांच्या बड्या थकबाकीदार संस्थांचे कर्ज माफ करण्याच्या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा काढला होता. यावेळी हा प्रकार घडला.

Before the meeting of Sangli District Bank, activists of Swabhimani Shetkari Sanghatana and the police had an argument | जिल्हा बँकेत 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते-पोलिसांत धक्काबुक्की

जिल्हा बँकेत 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते-पोलिसांत धक्काबुक्की

Next

सांगली : जिल्हा बँकेच्या सभेपूर्वी सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पोलिसांत धक्काबुक्की व वादावादी झाली. त्यामुळे जिल्हा बँकेत संतप्त कार्यकर्त्यांनी बँकेच्या पायरीवर ठिय्या मारून जोरदार घोषणाबाजी केली. याप्रकारानंतर बँक परिसरातील वातावरण तणावपुर्ण बनले.

येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत राजकीय लोकांच्या बड्या थकबाकीदार संस्थांचे कर्ज माफ करण्याच्या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा काढला होता. बँकेत त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला.

यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना फरफटत बाहेर काढले. त्यामुळे जिल्हा बँकेत वातावरण तणावपूर्ण बनले आहेत. संचालक विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतू संतप्त कार्यकर्त्यांनी बँकेच्या पायरीवर ठिय्या मारून घोषणाबाजी केली.

Web Title: Before the meeting of Sangli District Bank, activists of Swabhimani Shetkari Sanghatana and the police had an argument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.