जीप पलटी होवून बीडचा तरुण ठार: ऊसतोड मजुराचे धान्य घेऊन जाताना घटना
By शीतल पाटील | Updated: January 9, 2023 20:19 IST2023-01-09T20:19:32+5:302023-01-09T20:19:58+5:30
सांगली जिल्ह्यातील जतमध्ये अपघात

जीप पलटी होवून बीडचा तरुण ठार: ऊसतोड मजुराचे धान्य घेऊन जाताना घटना
जत : गुहागर- विजापूर मार्गावर जतपासून सात किलोमीटर अंतरावर बिरनाळ फाट्याजवळील पुलाशेजारी उसतोड मजुरांचे धान्य घेवून जाणारी जीप पलटी झाली. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला. तुकाराम शिवाजी मुंडे (वय २८ रा. वडवणी जि. बीड) असे मयत चालकाचे नाव आहे.
अधिक माहीती अशी, तुकाराम मुंडे गाडीचालक बीड येथील उसतोड मजुरांसाठी धान्य येवून कुंभारीकहून जतकडे येत होता. रात्रीच्यावेळी रस्त्यावरील बिरनाळ फाटयाच्यावर रस्त्याचा अंदाज आल्या नसावा. वाहनाचा ताबा सुटल्याने पुलावरून जीप पलटी झाली. यात चालक तुकाराम मुंडे याला गंभीर मार लागल्या. रात्रीच्यावेळी मदत मिळू न शकल्याने गाडीतच तो अडकून पडला होता. त्याचा जागीच मृत्यू झाला. जत ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांत नोंद झाली आहे.