शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

फुपेरेच्या अपंग बाळासाहेबाची मृत्यूशी झुंज

By admin | Updated: December 25, 2016 23:52 IST

दहा वर्षांपासून लढा : वैद्यकीय उपचारांची गरज; संधिवाताने अपंग

सहदेव खोत ल्ल पुनवतफुपेरे (ता. शिराळा) येथील बाळासाहेब श्रीपती गायकवाड हा चोवीस वर्षांचा, संधिवाताने अपंग बनलेला तरूण तीन महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देतोय. अंथरूणाला खिळून असलेल्या बाळासाहेबाला ना हालचाल करता येते, ना जेवता येते. केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तो दररोज मृत्यूला दूर लोटत आहे. एकुलत्या एका लेकराकडे केवळ हताशपणे पाहण्यापलीकडे त्याच्या हतबल आई-वडिलांकडे कोणताच मार्ग उरलेला नाही. फुपेरे येथील बाळासाहेब गायकवाड गरीब शेतकरी कुटुंबातला होतकरू मुलगा. वयाच्या चौदाव्या वर्षी आलेल्या संधिवाताच्या तापात त्याला अपंगत्व आले. त्याअगोदर तो इतर मुलांप्रमाणे खेळला, बागडला, शाळेलाही गेला. एकुलत्या एका मुलावर असा वाईट प्रसंग आल्यावर त्याचे आई-वडील हादरून गेले. पोटच्या गोळ्याला वाचविण्यासाठी घरची दुभती जनावरे विकून, शेत गहाण टाकून आतापर्यंत त्याच्यावर खूप उपचार केले. मात्र बाळासाहेब याला अपंगत्वातून बाहेर पडताच आले नाही.त्याने मात्र जगण्यासाठी धडपड चालूच ठेवली. अपंगत्वामुळे बंद झालेले शिक्षण, कणदूर येथील दत्त विद्यालयाच्या मदतीने चालूही केले. दहावी-बारावीपर्यंत शिक्षण झाले. अपंगत्वावर मात करीत शिक्षणाच्या वाटेवर चालू लागलेला बाळासाहेब चिखली येथील आनंदराव नाईक महाविद्यालयात तो बी.ए. २ च्या वर्गापर्यंत पोहोचलाही. बाळासाहेबाच्या या जिद्दीला शिक्षक, गावकरी व इतरांनी वेळोवेळी मोलाचे सहकार्यही केले. त्याचा त्रास कमी कसा करता येईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिले. दोन लाकडी ठोकळ्याच्या साहाय्याने केवळ हातावर भार देऊन तो कसाबसा चालायचा. हात हेच त्याचे पाय झाले. मात्र नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते. आजवर चिकाटीने काहीतरी करून दाखविण्याची जिद्द अंगी बाणवून शिक्षण घेत असलेला बाळासाहेब खचून गेला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून आतापर्यंतच्या सर्व संकटांचा सामना करणारा बाळासाहेब अंथरुणाशी खिळून आहे. गणपती उत्सवादरम्यान पुन्हा आलेल्या तापाने बाळासाहेबचे सांधे पुन्हा आखडले आहेत. हात-पाय वाळू लागलेत. यामुळे प्रकृती त्याला साथ देईनाशी झाली आहे. अंगभर केवळ ठणका! तापाने जेवणही बंद झाले आहे. अपंग असूनही जीवनाची स्वप्ने रंगवणारा बाळासाहेब उद्विग्न मन:स्थितीत अंथरूणावर पडून आहे. डोळ्यात अश्रू. आई-वडिलांचे उतरलेले चेहरे व घरचे अठराविश्व दारिद्र्य पाहून कोणाचेही मन हेलावून जाईल. आई-वडिलांकडे त्याच्यावरील प्रभावी उपचारासाठी कवडीही नाही. त्यांच्याजवळ आहे ती केवळ हतबलता. आपल्या मुलाच्या उपचारासाठी कुणीतरी डॉक्टररूपी देवदूत किंवा त्याचा खर्च उचलणारा दाता किंवा एखादी सेवाभावी संस्था भेटावी व त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढावे, असा आशावाद मनी धरून त्याचे आई-वडील आसवे ढाळत आहेत, तर घरी असलेल्या तीन बहिणी भावासाठी प्रार्थना करीत आहेत.जीवनाचा आशावाद नोकरी करण्याचा...अपंगत्वावर मात करीत तीन महिन्यांपूर्वी बाळासाहेब याने एकट्याने पुण्याला जाऊन कोणत्या तरी सरकारी खात्याची परीक्षाही दिली आहे. एखादी बैठी नोकरी मिळेल व आई-वडिलांसाठी काहीतरी चांगले करून दाखवू, अशी स्वप्ने रंगवीत असतानाच त्याच्यावर नियतीने आघात केला आहे.