शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli- अर्भक चोरी प्रकरण: अज्ञाताने दिलेली माहिती कामी आली, अन् संशयित महिला सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 14:31 IST

पोलिसांचा कौशल्यपूर्ण तपास 

मिरज : मिरजेच्या शासकीय रुग्णालयातून अर्भक पळवून नेणारी महिला सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाली होती. त्या आधारे आणखी काही फूटेज तपासल्यानंतर संशयित महिला तासगाव-मिरज बसमधून शासकीय रुग्णालयाच्या आवारात उतरल्याचे दिसले. त्यामुळे पोलिसांनी तासगाव तालुक्यात तपास केला. याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने सावळजमध्ये नवजात बालक आणलेल्या महिलेची माहिती दिली अन् प्रकरणाचा उलगडा झाला.संशयित सारा साठे हिने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मिरजेतून अंकली फाटा गाठले. तेथून ती सावळजला गावी गेली. साराचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी ती रुग्णालयात कोठून आली, याचा शोध सुरू केला. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता तासगाव ते मिरज बसमधून सिव्हिलच्या प्रवेशद्वारात उतरल्याचे सीसीटीव्हीत दिसले. तासगाव बस स्थानकातून मिरजेच्या बसमध्ये ती चढल्याचीही खात्री झाली. तासगावपर्यंत तिचा माग काढल्यानंतर पोलिसांना अज्ञाताने सावळजमध्ये सारा साठे ही महिला एक नवजात बाळ घेऊन आल्याची माहिती दिली. यामुळे पोलिस सारापर्यंत पोहोचले.

प्रसूती विभागाची परिपूर्ण माहितीसारा व तिचा पती साहेबा हे इचलकरंजी येथील असून, दोघे जण प्रेमविवाह करून सावळज गावात येऊन राहिले आहेत. साहेबा हा पेंटिंगचा व्यवसाय करतो. काही महिन्यांपूर्वी सारा हिचा गर्भपात झाल्याने तिला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे तिला तेथील प्रसूती विभागाची पूर्ण माहिती होती. त्यातून तिने जन्मलेले बाळ चोरण्याचे धाडस केले.

पतीची कसून चौकशीसाहेबा साठे याच्या घरी पोलिस गेल्यानंतर त्याने नवजात अर्भक हे आमचेच असल्याचा दावा केला. साहेबा याचीही पत्नीच्या कृत्यास मूकसंमती असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.

पोलिस पथकाचे अभिनंदनअतिरिक्त पोलिस अधीक्षक रीतू खोकर, पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी अर्भकास शोधून काढणाऱ्या साहाय्यक निरीक्षक सुनील गिड्डे व पोलिस पथकाचे अभिनंदन केले. पोलिसांनी अर्भक शोधण्यासाठी केलेला कौशल्यपूर्ण तपास कौतुकाचा विषय ठरला आहे. या कामगिरीबद्दल शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार केला.

बाळाची होणार डीएनए तपासणीपोलिसांनी शोधून काढलेल्या नवजात अर्भकाची आता डीएनए तपासणी करण्यात येणार आहे. बाळ त्याच मातेचे आहे, याची खातरजमा करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मातेच्या डोळ्यांतून अश्रूच्या धाराअतिरिक्त पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन बाळाला मातेकडे सोपविल्यानंतर कविता यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. बाळ कुशीत आल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनीही कविता यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे बातचीत करून त्यांना धीर दिला.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस