शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

कोरोना संदर्भात मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 4:09 PM

केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो कोल्हापूर विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅनद्वारे जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते आज करण्यात आला.

ठळक मुद्देकोरोना संदर्भात मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृतीजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

सांगली : केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो कोल्हापूर विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅनद्वारे जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते आज करण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, सहायक क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी सतीश घोडके उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेकविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कोरोना साखळी तोडण्यासाठी कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, शारिरीक अंतर राखणे, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत घरोघरी भेटी देणाऱ्या आरोग्य पथकाला सत्य ती माहिती देऊन सहकार्य करणे आदिंबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.सांगली जिल्ह्यातील कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात विविध बाबतीत नागरिकांचे प्रबोधन आणि आरोग्य विषयक काळजी घेण्यासाठी या मोबाईल व्हॅनवरुन शाहिरी कलापथक, ऑडिओ क्लिपद्वारेही 30 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर या कालावधीत जनजागृती केली जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली