अहिल्याबाई होळकर संस्थेला पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:26 IST2021-09-03T04:26:34+5:302021-09-03T04:26:34+5:30

आटपाडी : सांगली येथील महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेला ‘ग्रामीण भागातील आदर्श शैक्षणिक संस्था’ या राज्यस्तरीय पुरस्काराने नुकतेच सन्मानीत ...

Award to Ahilyabai Holkar Society | अहिल्याबाई होळकर संस्थेला पुरस्कार

अहिल्याबाई होळकर संस्थेला पुरस्कार

आटपाडी : सांगली येथील महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेला ‘ग्रामीण भागातील आदर्श शैक्षणिक संस्था’ या राज्यस्तरीय पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष आर.एस चोपडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी शिक्षण मंत्री उदय सामंत, लुनेश विरकर उपस्थित होते.

महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी व दुर्गम भागात कार्यरत आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये संस्था हीरकमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. संस्थेचे अध्यक्ष आर. एस. चोपडे यांच्या संकल्पनेतून संस्थेत विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 'अहिल्या पॅटर्न'ची निर्मिती करून या पॅटर्नच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच संस्थेचे अंतिम ध्येय मानून विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जाते. महाराष्ट्रातील एकमेव टीचर मॅनेजमेंट संस्था म्हणून अहिल्या शिक्षण संस्थेची ओळख असून संस्थेची २५ युनिटे सध्या कार्यरत आहेत.

Web Title: Award to Ahilyabai Holkar Society