शिवरायांच्या गोमंतकातील यशोगाथेचा जागर, रविवारी ‘श्री सप्तकोटेश्वर’ मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:06 IST2026-03-13T18:05:45+5:302026-03-13T18:06:07+5:30

डिचोलीपासून सुरुवात, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

Awakening the success story of Shivaji Maharaj's Gomantaka, Saptakoteshwar campaign on Sunday | शिवरायांच्या गोमंतकातील यशोगाथेचा जागर, रविवारी ‘श्री सप्तकोटेश्वर’ मोहीम

शिवरायांच्या गोमंतकातील यशोगाथेचा जागर, रविवारी ‘श्री सप्तकोटेश्वर’ मोहीम

सागली : गोमंतक भूमीतील ऐतिहासिक व धार्मिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने ‘श्री सप्तकोटेश्वर’ मोहीम गोमंतक आयोजित करण्यात आली आहे. ही मोहीम रविवार, दि. १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजता गोव्यातील डिचोली येथील शिवतीर्थातून सुरू होऊन श्री सप्तकोटेश्वर मंदिरापर्यंत जाणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक-अध्यक्ष नितीन चौगुले यांनी दिली.

गोमंतकातील श्री सप्तकोटेश्वर हे कदंब राजांचे राज्यदैवत मानले जाते. इतिहासात अनेक आक्रमणांमुळे मंदिराचे नुकसान झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी इ.स. १६६८ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याला नवसंजीवनी दिली. या ऐतिहासिक स्मृती जागवण्यासाठी आणि हिंदवी स्वराज्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेत सहा ते सात हजार शिवभक्त सहभागी होतील. 

गोवा ही पर्यटनाची नव्हे तर ऐतिहासिक भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. गोव्यातील अनेक गडकोट शिवराय व शंभूराजेंनी जिंकले आहे. हिंदवी स्वराजाचा मोठा इतिहास या भूमीला लाभला आहे. हा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही चौगुले यांनी सांगितले.

मोहिमेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाषराव फळदेसाई, आमदार चंद्रकांत शेट्ये, इतिहास संशोधक भारत आदमपुरे उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title : शिवाजी महाराज की गोवा विजय का उत्सव: रविवार को 'श्री सप्तकोटेश्वर' अभियान

Web Summary : शिवाजी महाराज की गोवा विजय और मंदिर जीर्णोद्धार के सम्मान में 'श्री सप्तकोटेश्वर' अभियान रविवार से शुरू होगा। शिव सैनिक डिचोली से मंदिर तक मार्च करेंगे, नई पीढ़ी के लिए ऐतिहासिक विरासत को पुनर्जीवित करेंगे। गोवा के मुख्यमंत्री सहित गणमान्य व्यक्ति उद्घाटन में भाग लेंगे।

Web Title : Shivaji Maharaj's Goa Victory Celebrated: 'Shri Saptakoteshwar' Campaign on Sunday

Web Summary : The 'Shri Saptakoteshwar' campaign, honoring Shivaji Maharaj's Goa victory and temple restoration, starts Sunday. Shiv Sainiks will march from Dicholi to the temple, reviving the historical legacy for the new generation. Dignitaries including Goa's Chief Minister will attend the inauguration.