सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अतुल माने, समाजकल्याण सभापती गीता पवार तर प्रभाग समिती तीनच्या सभापतीपदी माया गडदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. याबाबतची अधिकृत घोषणा शुक्रवारी होणार आहे.स्थायीसह विषय समितीच्या सभापतीपदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदत होती. या कालावधीत तीन सभापतीपदाची निवड बिनविरोध झाली. तर चार सभापतीपदासाठी शुक्रवारी निवडणूक होत आहे. सातपैकी सहा सभापतीपदे भाजपकडे तर एक सभापतीपद राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे जाणार आहे.महापालिकेच्या स्थायी समिती, महिला बालकल्याण, समाजकल्याण व चार प्रभाग समिती सभापतीपदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल झाले. सकाळी भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) व विरोधी काँग्रेसच्या गटनेत्यांनी नगरसेवकांची बैठक बोलाविली होती.भाजपकडून स्थायी समिती सभापतीपदासाठी अतुल माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर महिला बालकल्याण सभापतीपदासाठी बानू जमादार, समाजकल्याण सभापतीपदासाठी गीता सूरज पवार, प्रभाग एक सभापतीपदासाठी रईसा शिकलगार, दोनसाठी वैशाली राजू गवळी, तीनसाठी माया गडदे यांची नावे निश्चित करण्यात आली. तर प्रभाग समिती चार राष्ट्रवादीला सोडण्यात आली. तेथून राष्ट्रवादीच्या अश्विनी कोळी यांना उमेदवारी देण्यात आली. भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी महापौर धीरज सूर्यवंशी, भाजपचे नेते सुरेश आवटी, उपमहापौर गजानन मगदूम, गटनेते संदीप आवटी यांच्या उपस्थितीत नगरसचिवांकडे अर्ज दाखल केले.दुसरीकडे विरोधी काँग्रेस नगरसेवकांची बैठक गटनेते मंगेश चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक राजेश नाईक यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यावरून बरीच खलबते झाले. भाजपच्या अतुल माने, रोहिणी पाटील, संदीप आवटी यांनी विरोधी पक्षनेते चव्हाण यांची भेट घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. त्यावर बंद खोलीत चर्चा झाली.अखेर काँग्रेसने तीन प्रभाग समिती व महिला बालकल्याण समिती सभापतीपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महिला बालकल्याण समितीसाठी अंजली जाधव, प्रभाग एकसाठी अश्विनी कोळेकर, दोनसाठी सोनल पाटील सावर्डेकर व प्रभाग चारसाठी ॲड. बिलकिस बुजरूक यांचे अर्ज दाखल करण्यात आले.अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत स्थायी समिती, समाजकल्याण व प्रभाग तीन सभापतीपदासाठी केवळ एकच अर्ज आल्याने या तीन जागा बिनविरोध झाल्या. त्याची अधिकृत घोषणा शुक्रवार १३ रोजी आयोजित विशेष सभेत होणार आहे. तर उर्वरित सभापतीसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.
सभापतीपदावर महिलाराजमहापालिकेच्या सात विषय समिती सभापतीपदासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात स्थायी समिती वगळता उर्वरित सहाही सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) गट व विरोधी काँग्रेसने महिलांना संधी दिली आहे. विषय समितीमधील संख्याबळ पाहता सत्ताधारी गटाचेच सभापतीपदावर वर्चस्व राहणार आहे.पहिल्यांदा नगरसेवक ते थेट सभापतीमहापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्यांना थेट सभापतीपदाची लाॅटरी लागली आहे. भाजपचे अतुल माने, बानू जमादार, गीता पवार, रईसा शिकलगार, वैशाली गवळी, माया गडदे तर राष्ट्रवादीच्या अश्विनी कोळी हे सातजणही प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. आता त्यांना सभापतीपदाची संधी मिळाली आहे.
Web Summary : Atul Mane, Geeta Pawar, and Maya Gadde were elected unopposed as chairpersons in Sangli Municipal Corporation. Elections for four other positions are scheduled. BJP secured six positions, while NCP (Ajit Pawar) got one. Women dominate the chairperson roles, with many new corporators getting opportunities.
Web Summary : सांगली महानगरपालिका में अतुल माने, गीता पवार और माया गडदे निर्विरोध सभापति चुने गए। अन्य चार पदों के लिए चुनाव होने हैं। भाजपा ने छह पद हासिल किए, जबकि राकांपा (अजित पवार) को एक मिला। महिलाओं का सभापति पदों पर दबदबा, कई नए पार्षदों को अवसर।