चिंचणीच्या शिवस्मारक चौकात साकारणार आकर्षक शिवसृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:19 IST2021-02-20T05:19:20+5:302021-02-20T05:19:20+5:30

चिंचणी (ता. कडेगाव) येथे शिवस्मारक समिती, शिवप्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित शिवजयंती सोहळ्यात डॉ. विश्वजित कदम बोलत होते. आमदार ...

Attractive Shiv Srishti to be held at Shivsmarak Chowk, Chinchani | चिंचणीच्या शिवस्मारक चौकात साकारणार आकर्षक शिवसृष्टी

चिंचणीच्या शिवस्मारक चौकात साकारणार आकर्षक शिवसृष्टी

चिंचणी (ता. कडेगाव) येथे शिवस्मारक समिती, शिवप्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित

शिवजयंती सोहळ्यात डॉ. विश्वजित कदम बोलत होते. आमदार मोहनराव कदम, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष इंद्रजित मोहिते उपस्थित होते.

डॉ. विश्वजित कदम म्हणाले, ग्रामपंचायत स्तरावर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचे ऐतिहासिक काम झाल्यामुळे चिंचणी गावासह सोनहिरा खोरा वैभवशाली झाला आहे. शासनस्तरावरूनही येथील कामांसाठी निधी देण्यात येईल.

यावेळी दिग्विजय कदम, हर्षवर्धन कदम, पी. सी. जाधव, निवृत्ती जगदाळे, बापूसाहेब पाटील,

सरपंच मनीषा माने, उपसरपंच दीपक महाडिक, विश्वास महाडिक आदी उपस्थित होते. प्रताप महाडिक यांनी स्वागत केले. आकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय पाटील यांनी आभार मानले.

चौकट :

झांजपथक,

मर्दानी खेळाने रंगत

कसबे डिग्रज येथील झांज पथकाने सोहळ्याला रंगत आणली.

तसेच आगाशिवनगर कराड व आस्टेडो आखाडा कडेगाव व सांगली येथील मुलांनी शिवकालिन युद्धकला, तलवारबाजी, दांडपट्टा लाठी चालविणे आदी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करत शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.

Web Title: Attractive Shiv Srishti to be held at Shivsmarak Chowk, Chinchani