शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

दारूच्या बाटलीसाठी पारधी कुटुंबाच्या घरावर हल्ला, मारहाण करुन संसारोपयोगी साहित्य जाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 1:16 PM

बाटली घेतल्यानंतर आणखी एका बाटलीची मागणी केली; पण ती न दिल्याने चव्हाण बंधूंना बघून घेण्याची धमकी देत ते सर्वजण तेथून निघून गेले अन् नंतर मारहाण केली.

जत/माडग्याळ : शेड्याळ (ता. जत) येथे दारूच्या बाटलीसाठी दहाजणांनी सिनेस्टाईलने पारधी कुटुंबाच्या घरावर तुफान दगडफेक करत घरातील साहित्य पेटवून दिले. यात तिघा सख्ख्या भावांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी रात्री आठच्यासुमारास घडली. जत पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.बादल रमेश चव्हाण (वय २५), सागर रमेश चव्हाण (२२) व आकाश रमेश चव्हाण (२०) अशी जखमींची नावे आहेत, तर सागर चव्हाण याने जत पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून शेडयाळचे माजी सरपंच अशोक पाटील, चंद्रकांत गुगवाड, सुरेश हावगोंडी, सुरेश देवर्षी, मास्तर तेली व अन्य अनोळखी पाच अशा दहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

शेड्याळ येथील बिरबल काळे यांच्या जागेत रमेश नामदेव चव्हाण यांनी पत्र्याचे शेड उभारले आहे. ते पत्नी सखुबाई व मुले बादल, आकाश, सागर यांच्यासह तेथे राहतात. गुरुवारी ते पत्नीसह सोरडी येथे पाहुण्यांकडे गेले होते. तिन्ही मुले घरी होती. रात्री आठच्यासुमारास चंद्रकांत गुगवाड, सुरेश देवर्षी, अशोक पाटील व अन्य एकजण चव्हाण यांच्या घरी आले. त्यांनी चव्हाण यांच्या मुलांकडे वडिलांसाठी आणलेली दारूची बाटली मागितली. बाटली घेतल्यानंतर आणखी एका बाटलीची मागणी केली; पण ती न दिल्याने चव्हाण बंधूंना बघून घेण्याची धमकी देत ते सर्वजण तेथून निघून गेले.रात्री साडेनऊच्यासुमारास तिघेही घरात असताना घरावर तुफान दगडफेक सुरू झाली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, अशोक पाटील, चंद्रकांत गुगवाड, सुरेश हावगोंडी, सुरेश देवर्षी, मास्तर तेली व अनोळखी पाचजण हातात काठ्या, दगड व हॉकीस्टिक घेऊन आल्याचे दिसले. या सर्वांनी तिघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी सागर व आकाश वळसंगच्या दिशेने पळून गेले. बादल यास दहाजणांनी जबर मारहाण केली. तसेच घरातील फ्रीज, टीव्हीसह अन्य साहित्य बाहेर काढून पेटवून दिले. यानंतर सर्वजण तेथून निघून गेले.

घटनेची माहिती मिळताच आदिवासी समाजाचे जिल्हाध्यक्ष बसवराज चव्हाण, राहुल काळे, जतचे नगरसेवक नामदेव काळे यांनी शेड्याळ येथे धाव घेत जखमी बादल चव्हाण यास सांगलीत उपचारासाठी दाखल केले. या मारहाणीत सागर चव्हाण व आकाश चव्हाण हेही जखमी झाले आहेत. जत पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी