Atpadi Nagar Parishad Election Result 2025: आटपाडीत सत्ता शिंदे सेनेची, नगराध्यक्ष मात्र भाजपचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:56 IST2025-12-21T13:54:46+5:302025-12-21T13:56:11+5:30
आटपाडी नगरपंचायत निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी अशी चौरंगी लढत झाली होती

Atpadi Nagar Parishad Election Result 2025: आटपाडीत सत्ता शिंदे सेनेची, नगराध्यक्ष मात्र भाजपचा
सांगली : आटपाडी नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक चुरशीची झाली. या नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्वाधिक ८ जागा शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मिळाल्या, पण नगराध्यक्षपदी मात्र भाजपचे यु. टी. जाधव विजयी झाले. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीला प्रत्येकी एक जागेवर समाधान मानावे लागले.
आटपाडी नगरपंचायत निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी अशी चौरंगी लढत झाली. सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यापासून भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार यु. टी. जाधव यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. जाधव हे ११७७ मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आठ जागा मिळाल्या.
शिंदे सेनेचे स्वाती सातारकर, सावित्री नरळे,अमरसिंह पाटील, धनाजी कानाप्पा चव्हाण, संतोष लांडगे, निशिगंधा शरद पाटील , अनुजा दत्तात्रय चव्हाण, बाळासो हजारे असे आठ उमेदवार विजयी झाले. भाजपला सात जागा विजय मिळाला. भाजपचे ऋषिकेश देशमुख, डॉ जयंत पाटील, राधिका दौंडे, ललिता जाधव, महेश देशमुख, अजित जाधव, मनीषा पाटील विजयी झाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संध्या अनिल पाटील तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मनिषा मनोज कुमार या विजयी झाल्या.