शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! डफळापूरातील एटीएम दरोडा प्रकरण, पोलीसच निघाला चोरीतील सूत्रधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 15:56 IST

चोरट्यांनी मशीन वजनाने जड असल्याने व मशीनमधून पैसे निघत नसल्याने रस्त्यावरच एटीएम मशीन टाकून पलायन केले होते.

जत : डफळापूर (ता. जत) येथे दाेन दिवसांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवर दरोड्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणाचा सूत्रधार पोलीस कर्मचारीच असल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. जत पाेलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील सचिन यशवंत कोळेकर (रा. रामपूर, ता. जत) या कर्मचाऱ्यासह सुहास मीरासाहेब शिवशरण (रा. रामपूर, ता. जत) या साथीदाराला साेमवारी अटक केली.डफळापूर येथे २९ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुख्य रस्त्यावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम सेंटर फाेडून दराेड्याचा प्रयत्न झाला हाेता. एटीएम मशीन ओढून बाहेर काढण्यात आले हाेते. ते पळवून नेण्याचा प्रयत्न चाेरट्यांचा होता. मात्र अवजड मशीन उचलता न आल्याने ते रस्त्यावरच टाकून चाेरट्यांनी पलायन केले होते. दोन दिवसांपासून जत पोलिसांनी अत्यंत शिताफीने यंत्रणा राबवत तपासाला गती दिली. साेमवारी या प्रकरणाचा छडा लागला.तपासामध्ये कवठेमंहाकाळ पोलिसात कार्यरत असलेला व मूळचा जत तालुक्यातील रामपूर येथील सचिन यशवंत कोळेकर हाच या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार असल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला. कोळेकर व त्याचा साथीदार सुहास शिवशरण या दोघांना जत पोलिसांनी अटक केली. सोमवारी दोघांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.शुक्रवारी रामपूर येथील प्रतिष्ठित शेतकऱ्याची माेटार घेऊन दाेघे डफळापूरमधील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमसमाेर आले. माेटारीच्या साहाय्याने त्यांनी एटीएम मशीन बाहेर ओढले. हे मशीन पळवून नेण्याचा त्यांचा प्रयत्न हाेता. मात्र मशीन वजनाने जड असल्याने व मशीनमधून पैसे निघत नसल्याने दाेघांनी रस्त्यावरच एटीएम मशीन टाकून पलायन केले. पावसामुळे चिखलात मिळालेल्या गाडीची चाके रुतलेल्या खुणा तसेच ठसेतज्ज्ञांच्या मदतीने या घटनेचा छडा लावण्यात यश आले.या घटनेमुळे जत पोलिसांचे कौतुक होत असले तरी पोलीस दलातील कर्मचाऱ्यानेच चोरीचा प्रयत्न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त हाेत आहे. पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी या प्रकरणाचा तपास केला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस