शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP: अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून पहिले वर्ष अध्यक्षपद आम्हालाच द्या, राष्ट्रवादीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:58 IST

प्राथमिक चर्चा निर्णयाविना संपली; चेंडू मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे 

सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर श्रद्धांजली म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिल्या वर्षी आम्हाला द्या, अशी भूमिका पक्षाच्या नेत्यांनी मांडली. सोमवारी मिरजेत शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) निशिकांत पाटील, माजी खासदार संजय पाटील, शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्यासह अमोल बाबर, जनसुराज्यचे नेते समित कदम यांची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेत सत्तास्थापना आणि अध्यक्षपदासह विविध पदांचे वाटप याविषयी चर्चा झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेेसने अध्यक्षपदाचा दावा प्रदेशाध्यक्षांपर्यंत नेला आहे. तोच दावा आज भाजपसोबतच्या बैठकी कायम ठेवला. पालकमंत्री पाटील हे सोमवारी शासकीय कार्यक्रमासाठी सांगलीत आले होते, तत्पूर्वी त्यांनी महायुतीतील पक्षांसोबत संवाद साधला. दुपारी सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष अध्यक्षपदावर ठाम असल्याचे दिसून आले.राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत भाजपसह महायुती आणि पहिले वर्ष अध्यक्षपदाची संधी हा प्रस्ताव पक्षनेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठविला आहे. त्याचा पुनरुच्चार आज पालकमंत्र्यांपुढे केला.शिंदेसेनेनेही अध्यक्षपदाचा रेटा कायम ठेवला. यासंदर्भात आमदार सुहास बाबर हे दोन दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला कसा असेल, याबाबत भाजपचा प्रस्ताव मांडला. प्रत्येकी सव्वा वर्षांचे चार अध्यक्ष करण्याचा तोडगा पुढे केला. भाजपचे संख्याबळ मोठे असल्याने पहिला अध्यक्ष आमचाच होईल असेही स्पष्ट केले. मात्र यावर एकमत होऊ शकले नाही. आता अंतिम निर्णय तीनही पक्षांच्या मुंबईस्थित नेत्यांशी चर्चेनंतर होणार आहे.अशा राजकारणात आम्ही सत्तेत कसे येणार?आमदार सुहास बाबर यांनी या बैठकीत जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविषयी तक्रार उपस्थित केली. पडळकर यांच्या खानापूर-आटपाडी मतदारसंघातील त्रासदायक आणि विरोधी भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्याकडून असे राजकारण होत असल्याने त्यांच्यासोबत आम्ही सत्तेत सहभागी का व्हावे, असा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. पाठिंब्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चेनंतरच घेता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी महायुतीत सहभाग आणि पहिल्या वर्षी अध्यक्षपदाची मागणी यासंदर्भात आम्ही दोन दिवसांत पक्षनेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटणार आहोत. स्थानिक परिस्थितीविषयी चर्चा करू निर्णय घेणार आहोत. - निशिकांत पाटील, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण), राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार)

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli ZP: NCP Wants First Year as Tribute to Ajit Pawar

Web Summary : NCP demands Sangli ZP's first year chairmanship as tribute to Ajit Pawar. Discussions with BJP and Shinde Sena continue, focusing on power-sharing and potential formulas, including rotational leadership. Final decision pending Mumbai leaders' approval.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMahayutiमहायुतीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस