आष्ट्यातील केळी फळे बाजारात अर्जुन माने यांच्या देशी केळीला ३३ हजार उच्चांकी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:19 AM2021-06-22T04:19:38+5:302021-06-22T04:19:38+5:30

आष्टा येथील प्रगतशील शेतकरी अर्जुन माने यांच्या देशी केळीला ३३ हजार दर मिळाला. यावेळी अल्लाउद्दीन चौगुले, पोपट झांबरे, बाजीराव ...

Arjun Mane's native bananas fetch a high of Rs 33,000 in the Ashta banana market | आष्ट्यातील केळी फळे बाजारात अर्जुन माने यांच्या देशी केळीला ३३ हजार उच्चांकी दर

आष्ट्यातील केळी फळे बाजारात अर्जुन माने यांच्या देशी केळीला ३३ हजार उच्चांकी दर

Next

आष्टा येथील प्रगतशील शेतकरी अर्जुन माने यांच्या देशी केळीला ३३ हजार दर मिळाला. यावेळी अल्लाउद्दीन चौगुले, पोपट झांबरे, बाजीराव पाटील, विवेक महाजन, संतोष देसाई, विजय जाधव व मोहन पाटील.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, इस्लामपूरच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या केळी व फळे बाजारात प्रगतशील शेतकरी अर्जुन माने यांच्या देशी केळीला ३३ हजार १ रुपये दर मिळाला.

लॉकडाऊननंतर देशी केळी या पिकाला प्रथमच उच्चांकी दर मिळाला. यावेळी आंबा, केळी, सफरचंद, पपई व पेरू या फळांचीही मोठ्या प्रमाणावर बाजारात आवक झाली होती. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अल्लाउद्दीन चौगुले, विवेक महाजन, पोपट झांबरे, विलास माळी, रोहित सोनवणे, संतोष देसाई, बाजीराव पाटील, जयपाल कांबळे, दशरथ माळी, अनिल निकम, दीपक ढोले, पिंटू वाडकर, विजय जाधव, मोहन पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

अध्यक्ष अल्लाउद्दीन चौगुले म्हणाले, आष्टा येथील उपबाजारात केळी व इतर फळांचे प्रत्येक सोमवार व गुरुवारी सौदे होत आहेत. याचा परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा.

Web Title: Arjun Mane's native bananas fetch a high of Rs 33,000 in the Ashta banana market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.