शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

अरब पर्यटकांची मिरजेकडे पाठ...

By admin | Updated: December 25, 2016 23:49 IST

नोटा बंदीचा परिणाम : लॉजसह इतर व्यावसायिकांना फटका

मिरज : नोटा बंदीमुळे आखाती देशांतून मिरजेत येणाऱ्या अरब नागरिकांची संख्या घटली आहे. वैद्यकीय उपचाराच्या कारणासाठी मिरजेत येणारे अरब सध्या नोटा बंदीमुळे येत नसल्याने, लॉजसह रुग्णालये व एजंटांच्या व्यवसायास फटका बसला आहे. मिरजेत उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधांमुळे आखाती देशातील कतार, मस्कत, ओमान, बहारीन, सौदी, दुबई या देशांतील अरब मिरजेत येतात. तृतीय व चतुर्थश्रेणी कामगार किवा छोटे व्यावसायिक अरब मिरजेत येतात व श्रीमंत अरब मुंबई, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरात जातात. १९८० पासून पर्यटन व उपचाराच्या कारणासाठी अरब मिरजेत येतात. मिरजेत केवळ अरबांसाठी काही लॉजेस सुरू आहेत. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या हंगामात मिरजेत येणाऱ्या अरबांना सर्व सुविधा पुरविणारे एजंट प्रत्येक लॉजवर आहेत. लॉजवरील वेटरपासून रिक्षावाल्यांपर्यंत सर्वांचीच या अरबांमुळे चांगली कमाई होते. मिरजेत यापूर्वी हजारो अरब येत असल्याने, लॉजेससह काही रुग्णालयांचे फलकही अरबी भाषेत झळकत होते. अरब पर्यटकांमुळे मिरजेतील व्यवसाय, उद्योगांना आधार मिळाला. मात्र त्यातून गैरप्रकार सुरू झाल्यामुळे, मौजमजेसाठी येणाऱ्या अरब पर्यटकांच्या गैरवर्तणुकीविरूध्द ३० वर्षांपूर्वी मिरजेत ‘अरब हटाव’ आंदोलन झाले होते. त्यामुळे मिरजेकडे येणाऱ्या अरबांची संख्या कमी होऊन, अरब पर्यटक हैदराबाद व बेंगलोरकडे वळले. मात्र गेल्या दोन वर्षात मिरजेत पुन्हा अरब पर्यटक येऊ लागल्याने, येथील लॉजसह, रुग्णालये व एजंटांची कमाई सुरू होती. मात्र नोव्हेंबर महिन्यात पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्यामुळे ऐन हंगामात अरबांचे आगमन बंद झाले आहे. मिरजेतील लॉजवर सध्या हाताच्या बोटावर मोजण्याऐवढेच अरब वास्तव्यास आहेत. (वार्ताहर)पोलिसांकडे नोंदणीअरबांच्या आगमनाची स्थानिक पोलिस ठाण्यात नोंद करून, सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ वास्तव्य करणाऱ्या अरबांची मुख्यालयात जिल्हा विशेष शाखेत नोंद करण्यात येते. अरब येताना सोबत सोने व परदेशी चलन घेऊन येत असल्याने, या कारणावरून संघर्ष होऊन मिरजेत यापूर्वी एजंटांच्या खुनाच्या घटनाही घडल्या आहेत. पर्यटक म्हणून येणाऱ्या काही अरबांमार्फत आखाती देशांतून भारतात रोख रक्कम पाठविण्याचा उद्योग हवाला एजंटांमार्फत होत असल्याची चर्चा आहे. मात्र नोटा बंदीमुळे हवाला कारभार थंडावला आहे. संख्या रोडावली...मध्य पूर्वेतील दहशतवादामुळे लॉजवर येणाऱ्या व आता एजंटांकडे किंवा उपचारासाठी रुग्णालयात वास्तव्य करणाऱ्या अरबांचीही जिल्हा विशेष शाखेकडे नोंद करणे सक्तीचे करण्यात आले आहे. व्हिसा संपलेल्या अरबांची रवानगी त्यांच्या देशात करण्यात येत आहे. त्यामुळेही अरबांची संख्या रोडावली आहे. त्याचा परिणाम व्यवसायावर होत आहे.