सात नद्या, सात गडावरच्या पाण्याने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 15:12 IST2021-06-24T15:10:45+5:302021-06-24T15:12:24+5:30
Shivrajyabhishek Sangli : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्यावतीने बुधवारी शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्यात सात नद्यांचे पाणी व दुधाचा अभिषेक करण्यात आला. संपूर्ण परिसराला फुलांनी सजवून पेढेवाटपही करण्यात आले.

सात नद्या, सात गडावरच्या पाण्याने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक
सांगली : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्यावतीने बुधवारी शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्यात सात नद्यांचे पाणी व दुधाचा अभिषेक करण्यात आला. संपूर्ण परिसराला फुलांनी सजवून पेढेवाटपही करण्यात आले.
तिथीनुसार हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा संघटनेतर्फे वसंतदादा साखर कारखाना येथील शिवतीर्थावर साजरा करण्यात आला. मूर्तीस गंगा, सिंधूसहित सात नद्या आणि सात गडावरचे पाणी व दुधाचा अभिषेक यावेळी करण्यात आला. यावेळी प्रेरणामंत्र म्हणून कार्यकर्त्यांनी ह्यजय शिवाजी, जय भवानीह्ण अशा घोषणा दिल्या.
सोहळ्यास संघटनेचे अध्यक्ष नितीन चौगुले, विकास सावंत, नितीन पवार, भूषण गुरव, पै. मोहन शिंदे, उमेश खोत, निलेश चौगुले, प्रतीक पाटील, संग्राम घोरपडे , पृथ्वीराज पाटील, जयदीप सदामते, अभिषेक आंबे, रोहन मोरे, रोहित मोरे, नितीन सोनंदकर, संदीप माळी, अवधूत बेलवलकर आदी उपस्थित होते.