Sangli: तोंडावर उशी दाबून वयोवृद्ध पतीने घेतला पत्नीचा जीव, वारंवार भांडणाच्या त्रासाला कंटाळून केलं कृत्य

By हणमंत पाटील | Published: November 11, 2023 12:06 PM2023-11-11T12:06:36+5:302023-11-11T12:07:23+5:30

कवठेमहांकाळ : कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे पती-पत्नीमध्ये वारंवार होणाऱ्या भांडणाच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून पतीने पत्नीचा तोंडावर उशी दाबून खून ...

An elderly husband took his wife life by pressing a pillow over his face in sangli | Sangli: तोंडावर उशी दाबून वयोवृद्ध पतीने घेतला पत्नीचा जीव, वारंवार भांडणाच्या त्रासाला कंटाळून केलं कृत्य

Sangli: तोंडावर उशी दाबून वयोवृद्ध पतीने घेतला पत्नीचा जीव, वारंवार भांडणाच्या त्रासाला कंटाळून केलं कृत्य

कवठेमहांकाळ : कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे पती-पत्नीमध्ये वारंवार होणाऱ्या भांडणाच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून पतीने पत्नीचा तोंडावर उशी दाबून खून केला. बुधवार दि. ८ राेजी पहाटे घडलेला हा प्रकार शुक्रवार दि. १० राेजी सकाळी उघडकीस आला. लतिका तानाजी पाटील (वय ६५, रा. कुची) असे मृत महिलेचे नाव आहे.

कवठेमहांकाळ पोलिसांत वयोवृद्ध पती तानाजी बापू पाटील (७४, रा. कुची) याच्याविराेधात खून करून पुरावा नष्ट करणे व खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद प्रवीण तानाजी पाटील (३९, रा. मुंबई मूळ गाव कुची) यांनी दिली आहे.

कुची गावापासून काही अंतरावर पाटील वस्तीवर पाटील कुटुंबीय राहते. वयोवृद्ध असलेले तानाजी पाटील आणि त्यांची पत्नी लतिका हे गावी राहत होते तर मुलगा प्रवीण हा मुंबईस असताे. गावी तानाजी पाटील याचा पत्नी लतिका यांच्यासाेबत सतत वाद हाेत असे. दिवाळीसाठी त्या नेरुळला (मुंबई) येण्यास तयार नव्हत्या. यावरुन बुधवारी पहाटे दाेघांमध्ये वादावादी झाली. रागाच्या भरात तानाजीने लतिका पाटील यांना चापट मारून खाली पाडले आणि तोंडावर उशी दाबून त्यांचा खून केला.

या प्रकारानंतर त्याने लतिका यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव केला. नातेवाईकांना तसे कळवून मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. लतिका यांचा घातपात झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील यांना गाेपनीय सूत्रांकडून मिळाली. त्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत घटनेचा उलगडा केला. वयोवृद्ध पत्नीचा खून करून खोटी माहिती देत अंत्यविधी करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तानाजी पाटील याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबतची फिर्याद मुलगा प्रवीण पाटील याने कवठेमहांकाळ पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी तानाजी पाटील याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील करत आहेत.

Web Title: An elderly husband took his wife life by pressing a pillow over his face in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.