अमोल कोल्हेंचा चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही, जोगेंद्र कवाडेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 14:22 IST2022-01-29T14:21:08+5:302022-01-29T14:22:00+5:30

रिपब्लीकन ऐक्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची भेट घ्यावी

Amol Kolhe film will not be allowed to be screened in the state warns Jogendra Kawade | अमोल कोल्हेंचा चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही, जोगेंद्र कवाडेंचा इशारा

अमोल कोल्हेंचा चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही, जोगेंद्र कवाडेंचा इशारा

सांगली : रिपब्लीकन ऐक्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची भेट घ्यावी असे आवाहन पिपल्स रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केले. तर, यावेळी त्यांनी गांधीहत्या आणि नथुराम गोडसेंचे समर्थन करणारा अमोल कोल्हे यांचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशाराही दिला. सांगलीत पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
 
यावेळी बोलताना कवाडे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अनुयायी असलेल्या अमोल कोल्हेचा नवा चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही. गांधीहत्येचे समर्थन कदापी सहन केले जाणार नाही. राज्य सरकारनेही चित्रपटाला परवानगी देऊ नये. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. कोल्हे यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. आम्ही देखील आवाडेंच्या म्हणण्याशी सहमत आहोत. कोल्हेंना पक्षात घेतलेच कसे? असा आमचा प्रश्न आहे. सरकारने चित्रपटाला परवानगी दिली आणि तो प्रदर्शित झाला, तर राज्यभरात चित्रपटगृहांवर हल्लाबोल करु.

तसेच रिपब्लीकन ऐक्यासाठी बाळासाहेबांना अनेकदा विनंत्या केल्या, पण रिपब्लीकन पक्षाशी देणे घेणे नाही असे त्यांचे म्हणणे होते. ऐक्याचे वारंवार आवाहन करणारे आठवले बाळासाहेबांना कितीवेळा भेटले हे देखील महत्वाचे आहे. आठवलेंनी स्वत: भेटून प्रयत्न करावेत. एमआयएमसह अन्य पक्षांना सोबत घेणाऱ्या बाळासाहेबांना रिपब्लीकनबाबत दुजाभाव का? हे कळत नाही. १९९८ मध्ये रिपब्लीकनच्या तिकिटावरच अकोल्यातून खासदार म्हणून निवडून गेले होते, हे लक्षात ठेवावे. ते येणारच नसतील, तर त्यांना सोडून ऐक्याचे प्रयत्न करावे लागतील असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी पिपल्स रिपब्लीकन पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, डेमोक्रॅटीक पक्षाचे प्रा. सुुकुमार कांबळे, जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे, संजय सोनवणे, गणेश उन्हउणे, गौतम कांबळे, शशिकांत सोनवणे, युसुफ शेख, यंगाप्पा शेट्टी, मलीक पठाण, सागर वाघमारे, परशराम कोळी, शहाबुद्दीन शेख, प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते.

..तरी मित्रपक्षांना सत्तेत वाटा नाही

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बनविण्यासाठी मित्रपक्षांनीह हातभार लावला आहे, पण सत्ता मिळून अडीच वर्षे झाली तरी मित्रपक्षांना सत्तेत वाटा मिळालेला नाही. ही राजकीय नितिमत्ता म्हणता येणार नाही. मित्रपक्षांनी यासंदर्भात वारंवार आठवण करुन दिली, तरीही दुर्लक्ष केले जात आहे.

रिपब्लीकन ब्रदरहूड

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकात रिपब्लीकन ब्रदरहूड संकल्पना राबविणार आहोत. विखुरलेल्या रिपब्लीकन घटकांना एकत्र आणून निवडणुका लढविल्या जातील. नागपुरात या संकल्पनेची अंमलबजाणी सुरु केली आहे.

Web Title: Amol Kolhe film will not be allowed to be screened in the state warns Jogendra Kawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.