शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात नगरपालिका, नगरपरिषदांचे रण पेटले; स्वबळाची खुमखुमी अन् युतीचीही तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 18:45 IST

राष्ट्रवादी, भाजप, कॉंग्रेस या प्रमुख पक्षांत एकमेकांचे हुकमी मोहरे खेचून घेण्यासाठी शर्यत सुरू

संतोष भिसेसांगली : नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा हंगाम सुरू होताच राजकीय कार्यकर्त्यांत एकमेकांच्या जिरवाजिरवीला सुरुवात झाली आहे. निवडणूक लढवताना स्वबळाची खुमखुमी उफाळून आली असून, गरजेनुसार युतीचीही तयारी उमेदवारांनी ठेवली आहे. एकीकडे युती-आघाडीसाठी वाटाघाटी सुरू असतानाच दुसरीकडे स्वतंत्र लढाईच्या गर्जनाही केल्या जात आहेत.पहिल्या टप्प्यात नगरपालिका, नगरपरिषदांची हातघाई सुरू झाली असून, वाटाघाटी आणि तडजोडींना बहर आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत आरोप-प्रत्यारोपांनी एकमेकाची चिंध्या करणारे नेते आता नगरपालिकेसाठी गळ्यात गळे घालत आहेत. विशेषत: जत, पलूस, शिराळा, विटा, आटपाडी, आष्टा येथील राजकारणाचे रण सध्या जोरात पेटले आहे. जतमध्ये राजकीय कोलांडउड्या खूपच जोरात आहेत. तेथे तिरंगी लढतीची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी, भाजप, कॉंग्रेस या प्रमुख पक्षांत एकमेकांचे हुकमी मोहरे खेचून घेण्यासाठी शर्यत सुरू आहे. जातीयवादाच्या राजकारणाचा प्रभाव असणाऱ्या येथील राजकारणात नेत्यांच्या प्रभावाचा करिष्मादेखील बाजी मारून जाणारा आहे. शिराळ्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असताना भाजप काय करणार? याची उत्सुकता आहे. महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे मुख्य घटक असल्याच्या स्थितीत शिराळ्यामध्ये मात्र युतीला तिलांजली देण्यात आल्याचे दिसत आहे. सुरुवातीला स्वबळाची खुमखुमी दाखवत असतानाच आता गळ्यात गळे घालून नेतेमंडळी मतदारांसमोर जात आहेत. पलूसमध्ये महायुती काही प्रमाणात अस्तित्वात येण्याची चिन्हे दिसत आहेत. अर्थात, तेथे कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भाजपची भूमिका महत्त्वाची आगे.महायुती, महाविकास आघाडी भंगलीमहायाुतीमधील भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तीनही पक्ष कोणत्याच निवडणुकीत एकत्र आल्याचे दिसत नाही. काही ठिकाणी भाजप शिंदेसेना, काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी, तर काही ठिकाणी शिंदेसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने हातमिळवणी केली आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन गट एकत्र आले आहेत. त्यामुळे नगरपालिका व नगर परिषद निवडणुकीपुरती महायुती व महाविकास आघाडी भंगल्याचे चित्र आहे. पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीर केल्याप्रमाणे जेथे फायदा तेथे स्वतंत्र आणि जेथे गरज तेथे युती-आघाडी हा मंत्र स्थानिक नेत्यांनी तंतोतंत पाळल्याचे दिसत आहे.

निकालानंतर युती-आघाडीची पुन्हा हातमिळवणीनिवडणुकीमध्ये एकमेकांविरोधात शड्डू ठोकलेले पक्ष निकालानंतर मात्र सत्तेसाठी पुन्हा एकत्र येऊ शकतात. त्यामुळे सध्या महाविकास आघाडी किंवा महायुती रिंगणात एकत्र दिसत नसली तरी खुर्चीसाठी संख्याबळाची जुळवाजुळव करताना त्यांना हातमिळवणी करावी लागण्याची चिन्हे आहेत. नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी वरिष्ठ नेते हस्तक्षेपकरून स्थानिक स्तरावर आघाडी किंवा युती करतील हे निश्चित आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Elections Heat Up: Independent Bids and Alliance Preparations

Web Summary : Sangli district's municipal elections see parties exploring solo runs and alliances. Local dynamics defy state-level coalitions as factions vie for power, potentially reuniting post-election for control.