शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जयंत पाटील यांना कोंडीत पकडण्याचा डाव; अजित पवार यांचा ग्राऊंड पातळीवर संपर्क तर भाजपचीही मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 17:03 IST

बड्या नेत्यावर गळ

अशोक पाटील इस्लामपूर : इस्लामपूर-शिराळा मतदार संघाचे खंदे नेतृत्व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोंडीत पकडण्याच्या राजकीय हालचाली सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्राऊंड पातळीवर संपर्क वाढविला आहे. अगोदरच भाजपचेही वरिष्ठ नेते लक्ष्य ठेवून आहेत. त्यामुळे २०२४ च्या नवीन वर्षात राष्ट्रवादीपुढे अर्थात जयंत पाटील यांच्यापुढे मोठे आवाहन उभे राहण्याचे संकेत आहेत.जयंत पाटील यांनी राजकारणात मागे वळून पाहिलेच नाही. नेतृत्वाचा आलेख वाढवत इस्लामपूर-शिराळा मतदार संघातील सर्वच विरोधक नेस्तनाबूत केले. राज्यात देवेंद्रराज आल्यानंतर इस्लामपूर मतदार संघात भाजपकडून जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, राहुल महाडिक, विक्रम पाटील यांना ताकद दिली जात आहे. परंतु रयत क्रांती शेतकरी संघटनेचे माजी राज्य मंत्री सदाभाऊ खोत ही ताकद टिकवू शकले नाहीत.२०२३ च्या सरत्या वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आनंदराव पवार यांनी शिवसेनेची ताकद भक्कम केली. त्यातच हुतात्मा संकुलातील गौरव नायकवडी यांनी आपला सवतासुबा मजबूत करण्याचा डाव केला आहे. विरोधकांची फळी मजबूत होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘एन्ट्री’ने विरोधकांत अधिकच भर पडली आहे.

शिराळा मतदार संघातही अशीच अवस्था आहे. विद्यमान आ. मानसिंगराव नाईक यांना ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची ताकद मिळाली. परंतु भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महाडिक आणि देशमुख गटाला ताकद देण्याचा एक कलमी कार्यक्रम आखला आहे.

बड्या नेत्यावर गळउपमुख्यमंत्री अजित पवार या मतदार संघात एका बड्या नेत्यावर गळ टाकून बसले आहेत. यासाठीच इस्लामपूर-शिराळा मतदार संघाच्या सीमारेषा लगत पुणे-बेंगलोर महामार्गावर साखर उद्योगातील मोठा प्रकल्प उभा करत जयंत पाटील यांना शह देण्याची खेळी सुरू केली आहे. एकंदरीत सरत्या वर्षात आणि येणाऱ्या नवीन वर्षातही जयंत पाटील यांच्यापुढे तगडे आव्हान उभे करण्याचा महायुती शासनाकडून राजकीय डाव सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारBJPभाजपा