शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

सांगली जिल्हा बँकेत शेती कर्जाचा ‘एनपीए’ ६२ कोटी : वर्षअखेर १00 कोटीचा पल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 01:00 IST

कर्जमाफीच्या आशेने थकीत होत असलेल्या कृषी कर्जामुळे राज्यातील सर्वच जिल्हा बँकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठीच राज्य सहकारी बँकेने नाबार्ड आणि केंद्रीय अर्थखात्याकडे शेती कर्जाची थकबाकी एनपीएमध्ये समाविष्ट न करण्याबाबत सवलत मिळावी, म्हणून प्रस्ताव दिला आहे.

ठळक मुद्देराज्य बँकेच्या मागणीस पाठिंबा; कर्जवसुलीत बँक प्रशासनासमोर अडचणी

सांगली : नैसर्गिक आपत्तीने पिचलेला शेतकरी आणि कर्जमाफीच्या आशेने थकीत ठेवलेले कर्ज, यामुळे शेतकऱ्यांसह आता जिल्हा बँकेसमोरील अडचणीही वाढल्या आहेत. सध्या बँकेचा शेतीकर्जाचा एनपीए ६२ कोटी इतका असून, मार्चअखेरीस तो १00 कोटीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे थकीत शेतीकर्ज ‘एनपीए’मध्ये समाविष्ट न करण्याबाबत राज्य बँकेने नाबार्ड व केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे केलेल्या मागणीस जिल्हा बँकेने पाठिंबा दर्शविला आहे.

कर्जमाफीच्या आशेने थकीत होत असलेल्या कृषी कर्जामुळे राज्यातील सर्वच जिल्हा बँकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठीच राज्य सहकारी बँकेने नाबार्ड आणि केंद्रीय अर्थखात्याकडे शेती कर्जाची थकबाकी एनपीएमध्ये समाविष्ट न करण्याबाबत सवलत मिळावी, म्हणून प्रस्ताव दिला आहे. त्याचबरोबर ३१ आॅगस्ट २0१९ ही कर्जमाफीची ‘कट आॅफ डेट’ ठेवावी, अशीही मागणी सरकारकडे केली आहे. या मागणीस सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने पाठिंबा दर्शविला आहे.

आपत्तीच्या दुष्टचक्रात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त होत असताना, कृषी क्षेत्राचा मुख्य कणा असलेल्या जिल्हा बँकेच्या अर्थचक्रालाही फटका बसत आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरीकडे कर्जमाफीच्या आशेने शेतकऱ्यांनी कर्जाची थकबाकी भरण्यास दाखविलेली असमर्थता, यामुळे जिल्हा बँकेच्या अडचणी वाढत आहेत. जिल्हा बँकेने १ लाख ५१ हजार २८४ शेतकºयांना २0१८-१९ या आर्थिक वर्षात अल्प व दीर्घ मुदतीच्या १ हजार १४७ कोटी ७६ लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. ३0 जूनअखेर यातील कर्जाची थकबाकी ३७९ कोटी १४ लाख इतकी आहे. एनपीएचा विचार केल्यास, सद्यस्थितीत केवळ कृषी कर्जाचा एनपीए ६२ कोटीच्या घरात आहे. त्याबाबत नाबार्ड किंवा केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून कोणताही दिलासादायक निर्णय न झाल्यास हा एनपीए १00 कोटीवर जाण्याची शक्यता आहे.

कृषी क्षेत्राला जिल्हा बँकेवर विसंबून राहावे लागते. त्यामुळे एकूण पीक कर्जापैकी सर्वाधिक वाटा जिल्हा बँकेचा असतो. तो वाटा जवळपास ७0 टक्के इतका आहे. बँकेने १ एप्रिल २0१९ ते ३0 सप्टेंबर २0१९ या काळात ९३ हजार ६२४ कर्जदारांना ५९ हजार ४२४ हेक्टरसाठी ५८४ कोटी ५३ लाखाचा कर्जपुरवठा केला आहे. यातील ४0 टक्के शेतकºयांना अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुमारे २३0 ते २५0 कोटी रुपयांची वसुली बाधित होणार आहे.

दरवर्षी बँकेस : ३२ कोटीचा तोटाशेतीकर्जातून बँकेला कधीही फायदा होत नाही. दरवर्षी ३२ ते ३४ कोटी रुपये शेतीकर्जातून नुकसान होत असते. तरीही शेतकऱ्यांची बॅँक म्हणून शेतीकर्जाची सेवा ती बजावत असते. बँकेचा सध्याचा एनपीए (नॉन प्रोडक्टीव्ह असेट्स) ५३६ कोटींचा असून, त्यात पीक कर्जाचे ६२ कोटी आहेत. याची टक्केवारी ११.८३ टक्के असून, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांबरोबर बँकेच्या एनपीएलाही मोठा दणका बसणार आहे.जिल्ह्यातील सोसायट्यांकडील कर्जाची थकबाकी वाढलीजिल्ह्यातील सोसायट्यांकडे ८४ हजार ३५६ शेतकºयांची ६८० कोटी रुपयांची थकबाकी आहे. व्याजासहीत ही रक्कम मार्चअखेरीस १ हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोसायट्यांच्या अडचणीही वाढल्या आहेत.

 

जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यामुळे आम्ही संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली होती; मात्र शेती कर्जाच्या थकबाकीचा डोंगर वाढत असल्याने जिल्हा बँकेबाबत दिलासादायक निर्णयही सरकारने घेतला पाहिजे. शेतकरी अडचणीत आल्याने सोसायट्या आणि पर्यायाने जिल्हा बँकेच्या अडचणीही वाढतात. त्यामुळे कट आॅफ डेट निश्चित करून थकीत शेतीकर्ज एनपीएत समाविष्ट न करण्याबाबत निर्णय घ्यावा. राज्य बॅँकेने केलेली मागणी योग्य आहे. - दिलीपतात्या पाटील, अध्यक्ष, सांगली जिल्हा बॅँक

टॅग्स :bankबँकMONEYपैसा