शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सांगलीतील उपक्रम : लग्नातील आहेराने अनाथालयात बहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 4:03 PM

कोमेजणाऱ्या फुलांचा गुच्छ अल्पावधित कचऱ्याच्या कोंडाळ्यळत जातो. त्याच्या खरेदीसाठी घातलेले हजारो रुपयेसुद्धा कचऱ्याच्या ढीगात भर घालतात. दुसरीकडे थोड्याशा आर्थिक मदतीसाठी अनाथ मुले, महिला व त्यांचे संगोपन करणाऱ्या संस्था धडपडत असतात. समाजातील हा विरोधाभास दूर करीत सांगलीतील एका जोडप्याने रोख स्वरुपात आहेर मागितला आणि आलेल्या आहेरातून अनाथालयातील मुलांच्या चेहऱ्यावर फुलांपेक्षाही सुंदर बहर फुलविला.

ठळक मुद्देसांगलीतील उपक्रम : लग्नातील आहेराने अनाथालयात बहरलग्न, स्वागत समारंभात पुष्पगुच्छ टाळून मागविला रोख आहेर

सांगली : कोमेजणाऱ्या फुलांचा गुच्छ अल्पावधित कचऱ्याच्या कोंडाळ्यळत जातो. त्याच्या खरेदीसाठी घातलेले हजारो रुपयेसुद्धा कचऱ्याच्या ढीगात भर घालतात. दुसरीकडे थोड्याशा आर्थिक मदतीसाठी अनाथ मुले, महिला व त्यांचे संगोपन करणाऱ्या संस्था धडपडत असतात. समाजातील हा विरोधाभास दूर करीत सांगलीतील एका जोडप्याने रोख स्वरुपात आहेर मागितला आणि आलेल्या आहेरातून अनाथालयातील मुलांच्या चेहऱ्यावर फुलांपेक्षाही सुंदर बहर फुलविला.सांगलीतील प्रशांत कुलकर्णी व पुण्यातील गौरी नाईक या दोघांचा विवाह व स्वागत सोहळा या अनोख्या उपक्रमांनी चर्चेत आला. जाहिरात व इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात काम करणाऱ्या प्रशांत कुलकर्णी यांना सामाजिक कार्याचीही आवड आहे. त्यामुळे आवडीला कृतीत उतरविण्यासाठी त्यांनी आपल्याच लग्नाचा मुहूर्त साधला. अर्धांगीनी म्हणून आयुष्यात आलेल्या गौरी यांनाही हा उपक्रम भावला आणि त्यांनी लगेच त्यांच्या या इच्छेला आपल्या संमतीचे बळ दिले.

कृपया आहेर आणू नये, किंवा आपली उपस्थिती हाच अनमोल आहेर, अशा स्वरुपाच्या वाक्यांची सवय झालेल्या लोकांच्या हाती सुखद धक्का देणारी पत्रिका आली.  कृपया रोख स्वरुपात जास्तीत जास्त आहेर आणावा, जमा झालेली रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरली जाईल, असा यावर ठळक संदेश देण्यात आला. पुष्पगुच्छ आणून कचऱ्याची भर करण्यापेक्षा सामाजिक कार्यात सर्वांचा हातभार लागावा, हा दृष्टीकोन फलदायी ठरला.दोघांचे लग्न पुण्यात आणि स्वागत समारंभ सांगलीत झाला. या दोन्ही समारंभात रोख आहेर जमा करण्यासाठी दोन बॉक्स ठेवण्यात आले होते. आहेर घेऊन येणाऱ्यांना त्या बॉक्समध्ये टाकण्याच्या सुचना दिल्या जात होत्या. लोकांनी भरभरून मदत दिली. लग्नसमारंभात जमा झालेले २२ हजार रुपये पुण्यातील दिशा या महिला व मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या सामाजिक संस्थेस आणि स्वागत समारंभातीलही मोठी रक्कम मिरजेतील माहेर या अनाथ महिला व मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देण्यात आली.

स्वागत समारंभातील स्नेहभोजनाची सुरुवातही अनाथालयातील मुलांच्या पंगतीने करण्यात आली. अनाथ मुलांनी जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर पाहुण्यांना पंगतीला निमंत्रित करण्यात आले.प्रत्येक लग्नात हे घडावे!प्रशांत कुलकर्णी म्हणाले की, आम्ही सुरुवात केली आहे. दररोज राज्यात, देशात हजारो लग्नसमारंभ होत असतात. अशा बहुतांश लग्नात सामाजिक कार्यासाठी रकमा गोळा केल्या तर किती अनाथ मुले व महिलांना त्यापासून मदत मिळू शकते. पुष्पगुच्छ हाती येताच कचºयाच्या कोंडाळ््याच्या दिशेने वाटचाल करतात. त्यामुळे अशा गोष्टींवरचा खर्च प्रत्येकाने टाळावा.

टॅग्स :marriageलग्नSangliसांगली