शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अग्रणीचे पुनरुज्जीवन करणाऱ्या 'पोकलेन मशिन'चा वाढदिवस, दुष्काळ हटवून हिरवाईसाठी हातभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 12:11 IST

अग्रणी नदीच्या खोऱ्याची दुष्काळी पट्टा ही ओळख पुसून जलक्रांती करण्याच्या उद्देशाने जल बिरादरी गेल्या दशकभरापासून खोऱ्यात काम करत आहे.

कवठेमहांकाळ : ‘डिझेल गावकऱ्यांचे आणि मशिन जल बिरादरीचे’ या धर्तीवर शेकडो हेक्टर क्षेत्रात जलसंधारणाचे काम करणाऱ्या पोकलेन यंत्राचा तिसरा वाढदिवस कार्यकर्त्यांनी साजरा केला. दुष्काळी भागाला पाणीदार बनविण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या मशिनप्रती कृतज्ञता व्यक्त केली.अग्रणी नदीच्या खोऱ्याची दुष्काळी पट्टा ही ओळख पुसून जलक्रांती करण्याच्या उद्देशाने जल बिरादरी गेल्या दशकभरापासून खोऱ्यात काम करत आहे. जल बिरादरीचे महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र चुघ यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये याकामी पोकलेन मशिन सुपुर्द केले होते. सार्वजनिक जलसंधारणाचे काम करण्यासाठी संबंधित गावाने फक्त डिझेल द्यायचे आणि काम करून घ्यायचे, असे नियोजन केले. त्याला अनेक गावांनी प्रतिसाद दिला.नांगोळे, पिंपळवाडी, अग्रण धुळगाव, रांजणी, कोकळे, खलाटी, डफळापूर, डोंगरसोनी, कुकटोळी, रामपूरवाडी आदी गावांत डीप सीटीसी, मातीनाला बांध, तलाव खोदाई, जुन्या तलावातील गाळ काढणे, ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण, वनतळे अशी अनेक कामे मशीनद्वारे झाली. सध्या कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे वनजमिनीवर काम सुरू आहे.दुष्काळ हटवून हिरवाईसाठी हातभार लावणाऱ्या या मशिनप्रती कृतज्ञता म्हणून कार्यकर्त्यांनी त्याचा वाढदिवस साजरा केला. मशीनची सजावट करून केक कापला. मिठाई वाटली.

टॅग्स :Sangliसांगली