शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिवीरचा काळाबाजार केल्यास होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST

सांगली : कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ आणि त्यामुळे यंत्रणेवर ताण पडत असतानाच पुन्हा एकदा रेमडेसिवीरसह इतर औषधांचा तुटवडा ...

सांगली : कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ आणि त्यामुळे यंत्रणेवर ताण पडत असतानाच पुन्हा एकदा रेमडेसिवीरसह इतर औषधांचा तुटवडा भासत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रेमडेसिवीरचा पुरेसा साठा असून, त्याचा काळाबाजार केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

कोरोनाबाधितांवर उपचारासाठी रेमडेसिवीर उपयोगी ठरत असल्याने त्यास मागणी मोठी आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनीही इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही यासाठी व त्यातून रुग्णांच्या नातेवाइकांची लूट थांबविण्यासाठी दरपत्रक जाहीर केले आहे. तरीही काही ठिकाणी इंजेक्शनचा तुटवडा असल्याची सांगितले जात आहे.

सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनीही याबाबत प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर असा प्रकार घडल्यास त्यावर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

काही ठिकाणी जादा दराने विक्री होत असल्याचे तर काही ठिकाणी कृत्रिम तुटवडा निर्माण करून रुग्णांच्या नातेवाइकांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यात ७००हून अधिक इंजेक्शन उपलब्ध असून अजूनही मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त नितीन भांडारकर यांनी सांगितले.

कोट

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीरसह इतर औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे भासवत कोणी जादा दराने विक्री करत असेलतर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. असे प्रकार नागरिकांनी प्रशासनाच्या निर्दशनास आणून द्यावेत.

नितीन भांडारक, सहा.आयुक्त, अन्न व औषध प्रशासन