कवठेमहांकाळ तालुक्यातील कुचीजवळ भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, ११ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 11:45 IST2025-04-14T11:44:31+5:302025-04-14T11:45:24+5:30

कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे टॅम्पो व ट्रकच्या भीषण अपघातात मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील मजुरीसाठी गेलेल्या रेखा कांबळे या महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

accident near Kuchi in Kavathemahankal taluka; One woman died, 11 people were injured | कवठेमहांकाळ तालुक्यातील कुचीजवळ भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, ११ जण जखमी

कवठेमहांकाळ तालुक्यातील कुचीजवळ भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, ११ जण जखमी

सुशांत घोरपडे 

म्हैसाळ :-कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे टॅम्पो व ट्रकच्या भीषण अपघातात मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील मजुरीसाठी गेलेल्या रेखा कांबळे (४२) रा.म्हैसाळ या महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर अन्य अकरा जखमीवर मिरज येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील राणी वडर (४३),भारती कांबळे(२३),कांचन कांबळे(६०) सर्व रा.म्हैसाळ या महिला गंभीर जखमी आहेत. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कुची येथे हा अपघात झाला.

अपघातातील जखमींमध्ये मंगळ बेरड (४२), वनिता माने(४०), मंगळ आवळे(४०), पार्वती कांबळे(६०), अप्पा वाघमारे(५३), कबीर कांबळे(३९), राणी वडर(३८), श्रेयांश माने(९) यांचा समावेश आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील या सर्व महिला खरडी जि.सोलापूर येथे द्राक्ष काढण्यासाठी टेम्पोने सकाळी गेल्या होत्या. दिवसभर काम करून सायंकाळी घरी परतत असताना कुची कवठेमहांकाळ येथे (KA22AA 4770) या टेम्पोला  मागून येणाऱ्या  ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर सर्व जखमींना  रूग्णवाहिकेतून मिरज येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची बातमी समजताच म्हैसाळ येथील तरूण मिरज येथील रूग्णालयात दाखल झाले.

कुची येथे झालेल्या अपघातातील  पाच जण गंभीर जखमी झालेले अतिदक्षता विभागात आहेत.  इतर सर्व जखमीवर उपचार सुरू आहेत.

-  प्रकाश गुरव , अधिष्ठाता -मिरज शासकीय रूग्णालय मिरज

रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कुचीजवळ हा अपघात झाला.अपघातातील जखमी झालेल्या सर्वांना मिरज येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

- कबीर कांबळे , अपघातील जखमी -म्हैसाळ

Web Title: accident near Kuchi in Kavathemahankal taluka; One woman died, 11 people were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.