शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

कोरोनामुळे थंडावलेल्या मालमत्ता खरेदी-विक्रीतील व्यवहारांना पुन्हा गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 1:03 PM

शरद जाधव सांगली : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून थंडावलेल्या मालमत्ता खरेदी-विक्रीतील व्यवहारांनी पुन्हा गती पकडली आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात ...

शरद जाधवसांगली : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून थंडावलेल्या मालमत्ता खरेदी-विक्रीतील व्यवहारांनी पुन्हा गती पकडली आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात खरेदीसह नोंदणीचे प्रमाण जास्त आहे. दिवाळीच्या तोंडावर गेल्या महिन्यात ७६२ दस्त नोंदणी झाल्याने व्यवहार वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, तरीही गेल्यावर्षी कोरोनाचा कालावधी असतानाही जास्त नोंदणी झाल्या होत्या.

उपनिबंधक कार्यालयात जमीन, प्लॉट, फ्लॅट खरेदी विक्रीसह कर्जासाठीचे दस्तही तयार होतात. यासाठी सांगलीतील कार्यालयात नेहमीच गर्दी असते. कोरोनामुळे गेल्यावर्षी या व्यवहारांवर परिणाम झाला होता. तरीही पाचशेहून अधिक नोंदणी झाल्या होत्या. यावर्षीच्या सुरूवातीपासूनच व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली त्यामुळे व्यवहारातही हळूहळू का होईना वाढ होत आहे.

महसुलात नियमांचा अडसर

शासनाने जुलै महिन्यात तुकडे बंदीविषयक एक शासन निर्णय घेतल्याने महसुलाच्या संकलनास अडचणी आल्या. अगदी नोंदणी सातशेवर असल्या तरी त्यातील सर्वाधिक नोंदणी या कर्जप्रकरणाशी संबंधित आहेत. जमिनीचे तुकडे बंदीविषयक आदेश मागे घेतल्यास महसूल वाढण्यास मदत होणार आहे.

फ्लॅट खरेदीला सर्वाधिक पसंती

- नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांपैकी अनेकांनी फ्लॅट खरेदीसच पसंती दिल्याचे चित्र होते. दिवाळीमुळे यात वाढ झाली.

- महिन्याच्या सुरुवातीलाच दिवाळी आल्याने गेल्या महिन्यात नोंदणीसाठी गर्दी होती.

कार्यालयात गर्दी

- सांगलीतील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपनिबंधक कार्यालय आहे. या ठिकाणी सकाळपासून नोंदणी पूर्ण होईपर्यंत गर्दी कायम असते.

- खरेदी-विक्रीच्या व्यवहाराबरोबरच बँकविषयक दस्ताऐवजही याच ठिकाणी होत असल्यानेही गर्दी होत असते.

नागरिकांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि त्याच्या प्रक्रियेस प्रतिसाद मिळत आहे. अजूनही व्यवहार पूर्ववत झाल्यानंतर नोंदणीचे प्रमाण वाढणार आहे. - राहुल हांगे, अधिकारी

मालमत्ता खरेदी-विक्री

ऑक्टोबर २०१९ - ५८०

ऑक्टोबर २०२० - ९१९

ऑक्टोबर २०२१ - ७६२

टॅग्स :SangliसांगलीReal Estateबांधकाम उद्योगInvestmentगुंतवणूकcorona virusकोरोना वायरस बातम्या