‘अ ब क ड’ संगीत महोत्सव ६ पासून
By Admin | Updated: February 2, 2015 00:15 IST2015-02-01T23:35:13+5:302015-02-02T00:15:19+5:30
शहरातील तरुण भारत क्रीडांगणावर दररोज सायंकाळी ७ वाजता महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचेही मगदूम यांनी यावेळी सांगितले.

‘अ ब क ड’ संगीत महोत्सव ६ पासून
सांगली : अ ब क ड कल्चरल ग्रुपच्यावतीने मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती संगीत महोत्सवास शुक्रवार दि. ६ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात देशपातळीवरील नामवंतांच्या कलेचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना प्राप्त होणार आहे, अशी माहिती अ ब क ड कल्चरल ग्रुपचे अध्यक्ष शरद मगदूम यांनी दिलीसंगीत महोत्सवाचे उद्घाटन दि. ६ रोजी सायंकाळी ७ वाजता खा. सुप्रिया सुळे यांच्याहस्ते होणार असून यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी पंडित मंगेशकर यांचा खा. सुळे यांच्याहस्ते नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबध्द केलेल्या गाण्यांचा ‘हृदयगाणी’ हा कार्यक्रम होणार आहे. सूत्रसंचालन निवेदिका मंगला खाडिलकर या करणार असून कार्यक्रमात माधुरी करमरकर, मंदार आपटे, विद्या करलगीकर, सुचित्रा भागवत, नचिकेत देसाई या गायकांचा समावेश आहे.
शनिवार दि. ७ रोजी गायक राहुल देशपांडे यांच्या शास्त्रीय, नाट्य व भक्तिगीतांची मैफल होणार आहे.रविवार दि. ८ रोजी प्रसिध्द गायिका लता मंगेशकर यांच्या अजरामर हिंदी गीतांचा ‘मेरी आवाज ही मेरी पहचान है’ हा कार्यक्रम हुबेहूब लतादीदींच्या आवाजात गाणाऱ्या श्रीमती मित्सु वर्धन (कोलकाता) सादर करणार आहेत. शहरातील तरुण भारत क्रीडांगणावर दररोज सायंकाळी ७ वाजता महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचेही मगदूम यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)