शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

अनैतिक संबंधाचा संशय, बेदम मारहाण करीत गळा आवळून तरुणाचा केला खून; सांगलीतील आष्टा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 13:22 IST

पंधरा दिवसांत दुसरा खून, शहरात खळबळ

आष्टा : येथील नागाव रस्त्यावर अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाला फरफटत नेऊन बेदम मारहाण करीत त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. शिवाजी अप्पा कुलाळ (वय ३५, रा. रामनगर, आष्टा, मूळ गाव सोन्याळ, सरगरवस्ती, ता. जत) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी संशयित नवनाथ विठ्ठल ऐवळे (३५, रा. रामनगर, आष्टा) याला आष्टा पाेलिसांनी अटक केली आहे.शिवाजी कुलाळ याचा उसाचे वाडे खरेदी-विक्रीचा व्यवसाय हाेता. गेल्या काही वर्षांपासून कुटुंबासह आष्ट्यातील रामनगर परिसरात राहत हाेता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी गावी गेली आहे. व्यवसायानिमित्त त्याची नवनाथ एवळे याच्याशी ओळख हाेती. यादरम्यान नवनाथच्या नात्यातील एका विवाहितेशी त्याचे अनैतिक संबंध जुळलेे. याबाबत संशय येताच नवनाथने त्याला अनेकदा समजावून सांगितले होते, तरीही त्याच्यामध्ये सुधारणा हाेत नव्हती. यामुळे नवनाथ संतापला हाेता.मंगळवारी रात्री त्याने एका अल्पवयीन संशयिताच्या मदतीने शिवाजीला दूरध्वनीवरून नागाव रस्ता परिसरात बोलावून घेतले. रस्त्याकडेच्या माळावर शिवाजीला फरफटत नेऊन बेदम मारहाण केली. शेवटी गळा आवळून त्याचा खून केला.बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. आष्टा पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या खुनाबाबत शिवाजी याचा भाऊ विलास अप्पा कुलाळ याने फिर्याद दिली आहे. दरम्यान, आष्टा पोलिसांनी संशयित नवनाथ ऐवळे याला अटक केली आहे. सहायक निरीक्षक मनमित राऊत, महेश गायकवाड, सहायक उपनिरीक्षक संजय सनदी, राजेंद्र पाटील, अवधूत भाट, अभिजित धनगर, नितीन पाटील, प्रवीण ठेपने, योगेश जाधव, अमोल शिंदे, सूरज थोरात, अभिजित नायकवडी यांनी या प्रकरणाचा तपास केला.पंधरा दिवसांत दुसरा खून, शहरात खळबळआष्टा येथे २७ फेब्रुवारी रोजी ओंकार रकटे या तरुणाचे माेटारीतून अपहरण करून तिघांनी गळा आवळून खून केला हाेता. खुनानंतर ओंकारच्या मृतदेहावर आष्ट्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करून राखेचीही विल्हेवाट लावली. यापाठोपाठ पंधरवड्यात दुसरा खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस