शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

खोटे लग्न लावून सांगलीतील तरुणास पावणेदोन लाखांचा गंडा, सोलापूरच्या माय-लेकीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 15:47 IST

मोबाइलवर मुलगी प्रियांका शिंदे हिचा फोटो पाहून हसबे याने पैसे देण्यास होकार दिला.

विटा : पैशासाठी मुलीचे खोटे लग्न लावून देऊन दत्तात्रय नागेश हसबे (वय ३१, रा. हिवरे, ता. खानापूर) या तरुणाला एक लाख ७५ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सोलापूर व कर्नाटक राज्यातील पाच जणांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल आहे.जयश्री गदगे (रा. जुगुल, ता. चिकोडी, कर्नाटक), सुनील दत्तात्रय शहा (रा. निपाणी, कर्नाटक), धनम्मा उर्फ धानुबाई नागनाथ बिराजदार, मुलीची आई दीपाली विकास शिंदे व मुलगी प्रियांका विकास शिंदे (सर्व रा. सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत. मुलीची आई दीपाली शिंदे (वय ४०) व नववधू प्रियांका शिंदे (वय २१) यांना अटक झाली आहे.हिवरे येथील दत्तात्रय हसबे या तरुणाचा विवाह जमत नव्हता. त्यामुळे हसबे हा त्याचा मित्र संजय खिलारी याच्या ओळखीच्या कर्नाटकातील जयश्री गदगे या लग्न जुळविणाऱ्या महिलेकडे दोघेजण गेले. त्यावेळी संबंधित महिलेने सोलापूर येथे मुलगी चांगली आहे. परंतु, मुलीच्या घरच्यांना एक लाख व लग्न जुळविणारे एजंट सुनील शहा व धनम्मा उर्फ धानुबाई बिराजदार यांना ७० हजार रुपये द्यावे लागतील,असे सांगितले. मोबाइलवर मुलगी प्रियांका शिंदे हिचा फोटो पाहून हसबे याने पैसे देण्यास होकार दिला.मुलगीला हिवरेत येण्यासाठी हसबे याने जयश्रीला ऑनलाइन पाच हजार रुपये दिले. दि. २७ जुलै रोजी रात्री नऊ वाजता संशयित जयश्री गदगे, सुनील शहा, धनम्मा बिराजदार, मुलगी प्रियांका व तिची आई दीपाली शिंदे हे गावात आले. त्याच रात्री दोघांचा विवाह लावून दिला.यानंतर दि. ३० जुलै रोजी दीपालीही हिवरे आली. तिने कपडे घ्यायची आहेत, असे सांगून मुलीला घेऊन भिवघाटातला गेली. त्यांच्यासोबत दत्तात्रय व नातेवाईक गेले. दीपालीने भिवघाटातून प्रियांकाला सोलापूर घेऊन जाण्याची तयारी केली. दत्तात्रयने तिला विचारणा केली असता खोटे लग्न लावून देण्यासाठी २० हजार रुपये दिल्याचे दीपालीने सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दत्तात्रय हसबे याने विटा पोलिसांत जयश्री गदगे, सुनील शहा, धनम्मा बिराजदार, दीपाली शिंदे व प्रियांका शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दीपाली व प्रियांका शिंदे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीSolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न