भरधाव कार झाडावर आदळून मिरजेतील तरुण ठार, बेळगाव नजीक झाला अपघातात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 13:35 IST2022-09-26T13:34:50+5:302022-09-26T13:35:09+5:30
तर अनु राहील व बुरान काझी हे दोघे गंभीर जखमी झाले.

भरधाव कार झाडावर आदळून मिरजेतील तरुण ठार, बेळगाव नजीक झाला अपघातात
मिरज : बेळगाव (कर्नाटक) येथील वंटमुरी घाटाजवळ भरधाव मोटार रस्त्याकडेच्या झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात मिरजेतील सुलतान पीर काझी (वय २३ रा. शास्त्री चौक) हा तरुण जागीच ठार झाला. अपघातात मोटारीतील अनु राहील व बुरान काझी (दोघेही रा. मिरज) हे जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी हा अपघात झाला.
मिरजेतून सुलतान काझी, अनु राहील व बुरान काझी हे तिघे मोटारीतून (क्र. एमएच १० डीजी ६५०७) बेळगावकडे जात होते. सुलतान काझी हा मोटार चालवत होता. दुपारी ३ वाजता बेळगावपासून दहा किलोमीटर अंतरावर काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालक सुलतान याचे नियंत्रण सुटल्याने मोटारी रस्त्याकडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.
जोरदार धडक बसल्याने मोटारीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. अपघातात सुलतान काझी याचा जागीच मृत्यू झाला. तर अनु राहील व बुरान काझी हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मिरजेतून काझी याचे नातेवाईक बेळगावला रवाना झाले. काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने जखमींना बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.