Sangli News: शेतात सुरू होते मशागतीचे काम, नांगरणी करणाऱ्या ट्रॅक्टरने घेतला अचानक पेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 16:27 IST2023-02-17T16:27:20+5:302023-02-17T16:27:39+5:30

आगीत ट्रॅक्टरचे नुकसान

A tractor caught fire during cultivation near Sangliwadi | Sangli News: शेतात सुरू होते मशागतीचे काम, नांगरणी करणाऱ्या ट्रॅक्टरने घेतला अचानक पेट

Sangli News: शेतात सुरू होते मशागतीचे काम, नांगरणी करणाऱ्या ट्रॅक्टरने घेतला अचानक पेट

सांगली : शहरातील सांगलीवाडीनजीक इस्लामपूर रस्त्यावर शेतामध्ये नांगरणी करणाऱ्या ट्रॅक्टरने अचानक पेट घेतला. ट्रॅक्टरमध्ये बिघाड होऊन पेट घेतल्याने नुकसान झाले.
ट्रॅक्टर पेटल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलास माहिती दिली. पथकाने तातडीने शेतात येत आग आटोक्यात आणली.

रस्त्याकडेलाच एका शेतात गुरुवारी सकाळी मशागतीचे काम सुरू होते. अचानकच ट्रॅक्टरमध्ये बिघाड निर्माण झाला व धूर येऊ लागला. काही वेळातच पेट घेतल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. 

काहींनी अग्निशमन दलास आगीची माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या आगीत ट्रॅक्टरचे टायर पूर्णपणे जळून खराब झाले. अग्निशमन दलाचे अधिकारी विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: A tractor caught fire during cultivation near Sangliwadi