सांगली : जुना सातारा-सांगली रस्त्यावर टेम्पो-दुचाकीची समोरासमोर धडक, अपघातात शिक्षक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 19:20 IST2022-07-11T14:35:03+5:302022-07-11T19:20:55+5:30
ओव्हरटेक करीत असताना घडली दुर्घटना

सांगली : जुना सातारा-सांगली रस्त्यावर टेम्पो-दुचाकीची समोरासमोर धडक, अपघातात शिक्षक ठार
कडेगाव : रामापूर फाटा (ता. कडेगाव) येथे सोमवारी सकाळी १० च्या सुमारास टेम्पो व दुचाकीच्या अपघातात शिक्षक ठार झाला. सुरेश एकनाथ मांडके (वय ५५, रा. शिरसगाव, ता. कडेगाव) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.
शिरसगावचे सुरेश मांडके हे तुरची फाटा (ता. तासगाव) येथील भारती विद्यापीठ प्रशालेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. सोमवारी सकाळी १० च्या सुमारास ते कडेगावहून दुचाकीने शाळेला निघाले होते. ते रामापूर फाट्याजवळ आले असता शिंदे वस्तीलगत जुना सातारा-सांगली रस्त्यावर टेम्पो चालक ओव्हरटेक करीत होता. दरम्यान समोरून आलेल्या दुचाकीस टेम्पोची जोराची धडक झाली. यात दुचाकीवरील मांडके हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.