सांगलीत पसरली धुक्याची चादर, सूर्यदर्शन झालेच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 12:23 IST2022-09-30T12:22:48+5:302022-09-30T12:23:29+5:30
सुरेंद्र दुपटे संजयनगर ( सांगली ): गेल्या काही दिवसापासून सकाळी कडक ऊन अन् रात्री गारडा असे वातावरण अनुभवास येत ...

सांगलीत पसरली धुक्याची चादर, सूर्यदर्शन झालेच नाही
सुरेंद्र दुपटे
संजयनगर (सांगली): गेल्या काही दिवसापासून सकाळी कडक ऊन अन् रात्री गारडा असे वातावरण अनुभवास येत आहे. यातच आज, पहाटे सांगलीत दाट धुक्याची चादर निर्माण झाली. गुलाबी थंडी आणि दाट धुके असे मनमोहक वातावरण सांगलीतील नागरिकांनी अनुभवले.
वातावरणात गारवा वाढल्यामुळे नागरिकांना थंडीपासून बचाव करावा लागला. धुक्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील उपनगरामध्ये धुके पसरले होते. त्यामुळे रस्ते सुद्धा दिसत नव्हते. धुक्यामुळे वाहनचालकांना पुढील काही दिसत नव्हते. त्यामुळे वाहतूक संतगतीने सुरू होती. वाहन चालकांना वाहनाचे दिवे सुरू ठेवल्याशिवाय पर्याय नव्हता.