शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बांधकाम साइटवर अपघात, बालकामगार ठेवल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी; पोलिसाला अटक

By घनशाम नवाथे | Updated: December 30, 2024 19:28 IST

सांगली : बांधकाम साइटवर झालेल्या अपघातानंतर बालकामगार ठेवल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याबद्दल विश्रामबाग ...

सांगली : बांधकाम साइटवर झालेल्या अपघातानंतर बालकामगार ठेवल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याबद्दल विश्रामबाग पोलिस ठाण्यातील कर्मचारी शेखर जयवंत पाटणकर (वय ३८, रा. सांगली) याला अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.तक्रारदार हे बांधकाम साइटवर सळी बांधण्याचे कंत्राट घेतात. दि. ७ डिसेंबर रोजी तक्रारदार यांनी कंत्राट घेतलेल्या इचलकरंजी येथील बांधकाम साइटवर एक अल्पवयीन बालक त्याचे नातेवाईक अपघातात जखमी झाले होते. जखमींवर विजयनगर येथे भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. हॉस्पिटलमधून विश्रामबाग पोलिस ठाण्यात जखमींबाबत माहिती देण्यात आली होती. त्यासाठी पोलिस नाईक शेखर पाटणकर हा गेला होता. अपघातामध्ये तक्रारदार यांच्याविरुद्ध बालकामगार अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल न करण्यासाठी व बालकाचा जबाब तक्रारदार यांच्या बाजूने घेण्यासाठी पोलिस नाईक पाटणकर याने ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.तक्रारीनुसार दि. १० डिसेंबर रोजी पंचासमक्ष केलेल्या पडताळणीत पाटणकर याने २५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पाटणकर याने लाच स्वीकारली नाही. परंतु, त्याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याच्याविरुद्ध कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवला होता. तेथून परवानगी मिळाल्यानंतर पाटणकर याला अटक करून विश्रामबाग पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपअधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, किशोरकुमार खाडे आदींच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिस